Heart Attack Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack And Stroke: हार्ट अटॅकच्या रिसर्चमधून धक्कादायक माहिती उघड, 4 पैकी 1 व्यक्ती...

Heart Attack And Stroke : पाहायला गेलं तर अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

कोमल दामुद्रे

Heart Attack Symptoms : हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा प्रॉब्लम याला आजच्या जीवनशैलीमध्ये सर्वसामान्य पाहिले जात आहे. पाहायला गेलं तर अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

द इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार मद्रास मेडिकल कॉलेजच्या (Collage) डॉक्टरांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, त्यांच्या पहिल्या मोठ्या हृदयविकाराच्या वेळी चारपैकी एक व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह (Diabetes), उच्च कोलेस्टेरॉल आणि धूम्रपान यासारखे सामान्य जोखीम घटक नव्हते. तरीही हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचे प्रमाण वाढले

डॉ जी जस्टिन पॉल, अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि मद्रास मेडिकल कॉलेजमधील इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीचे प्राध्यापक म्हणतात. आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीत बदल करायला हवा. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होईल

अभ्यासात असेही आढळून आले की पुरुषांपेक्षा अधिक महिलांना चार जोखीम घटकांशिवाय हृदयविकाराचा झटका आला - 22.1 टक्के पुरुषांच्या तुलनेत 27.1 टक्के महिला आहेत. स्त्रिया आरोग्याला अधिक प्राधान्य देत नाही त्यामुळे हृदयविकाराची कारणे वाढली आहेत असे डॉ पॉल म्हणतात.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये वृद्धवयोगटातील धूम्रपान करणारे होते. जोखीम घटकांशिवाय हृदयविकाराचा झटका आलेल्यांचे सरासरी वय ५५.७ च्या तुलनेत ५७.४ होते. अभ्यासात असेही आढळून आले की हृदयविकाराच्या वेळी चार जोखीम घटक नसलेल्यांपैकी 10.4 टक्के पूर्वी तंबाखूचे सेवन करणारे होते, तर जोखीम घटक असलेल्यांपैकी केवळ 5 टक्के लोक होते.

1. हृदयाच्या काळजीसाठी

हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीत खाण्याच्या सवयी, व्यायाम आणि भावनिक स्थिरता या तीन गोष्टींचा समावेश केला पाहिजे. प्रत्येकाने आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी या तीन गोष्टींवर काम केले पाहिजे. लक्षणे अधिक गंभीर असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

2. हृदयाच्या आरोग्यासाठी तपासणी

  • डॉ पॉल म्हणतात की लोकांनी जीवनशैलीत बदल केले पाहिजेत - स्क्रीनिंग नेहमीच हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करत नाही.

  • ट्रेडमिल चाचणी किंवा इको करताना कोणतेच निदान होत नाही. परंतु काही दिवसांनी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. असे डॉक्टर पॉल म्हणतात.

  • शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या 70 टक्के बनतात ज्यामध्ये TMT, इको किंवा अँजिओग्राम सारख्या चाचण्यांमध्ये शोधले जाऊ शकतात. बहुतेक हृदयविकाराचा झटका लहान, अस्थिर गुठळ्यांमुळे होतो ज्या या चाचण्यांमध्ये शोधल्या जाऊ शकत नाहीत.

  • या गुठळ्या धोकादायक असतात कारण त्यांचे आवरण पातळ असते, ते चरबीने भरलेले असतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. चाचणीवर दिसणारे मोठे गुठळ्या अधिक तंतुमय आणि स्थिर असतात, त्यामुळे कमी धोका असतो.

  • जीवनशैलीतील बदल प्रत्येकाला हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करू शकतात, मग त्यात जोखीम घटक असोत किंवा नसो असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT