Home remedies, Health tips, Cumin seeds benefits  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Health tips : फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाचे आरोग्याला होतील अद्भूत फायदे जाणून घ्या

जीऱ्याचा वापर कसा कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या स्वयंपाकघरात फोडणीसाठी साधारणत: जीऱ्याचा वापर केला जातो. जीऱ्यामुळे जेवणाची चव वाढते.

हे देखील पहा -

भारतीय घरांमध्ये अन्न वेगवेगळ्या पध्दतीने बनविले जातात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसल्यामुळे ते अन्न पदार्थ आणखी स्वादिष्ट असतात. आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर आपण जिऱ्याचे रिकाम्या पोटी सेवन करु शकतो. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पौष्टिक घटकामुळे आरोग्याला त्याचे फायदे होतात. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीराला त्याचे कसे फायदे होतील हे जाणून घेऊया.

जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे -

१. ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास वारंवार होत असेल तर त्यांनी रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करायला हवे. त्यामुळे या समस्या कमी होण्यास मदत होईल. जीऱ्याचे पाण्यामुळे पोट फुगणे किंवा अपचनाच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो. जिऱ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया वेगवान होऊ शकते.

२. वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करायला हवे. रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याने सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. हे पाणी चयापचयची गतिमानता वाढवून शरीरातील चरबी जाळली जाते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

३. पावसाळ्यात आपली प्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप गरजेचे आहे. जिऱ्यामध्ये फायबर आढळते, जे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत नाही, परंतु जर नियमितपणे जिऱ्याचे पाणी प्यायले तर पावसाळ्यात (Monsoon) अनेक साथीच्या रोगांपासून दूर राहता येईल.

४. जिऱ्याच्या पाण्यात (Water) पोटॅशियमही मुबलक प्रमाणात आढळते. नियमितपणे जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. उच्च रक्तदाब किंवा इतर आजार आपल्याला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT