Healthy Aloo Puri Recipe google
लाईफस्टाईल

Aloo Puri Recipe: चमचमीत आणि हेल्दी आलू पुरी कशी बनवायची? लगेचच नोट करा रेसिपी

Aloo Puri Without Deep Frying: डीप फ्राय न करता तव्यावर बनवलेली हेल्दी आलू पुरी हिवाळ्यासाठी उत्तम नाश्ता ठरतो. कमी तेल, चवदार चव आणि पचनास हलकी असल्याने सर्वांसाठी योग्य.

Sakshi Sunil Jadhav

रोजच्या धावपळीमध्ये अनेकांना घरातलं जेवायला किंवा घरात जेवण करायला वेळच मिळत नाही. बऱ्याचदा कपल्स हे त्यांच्या फॅमिलीसोबत मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये जेवायला जातात. पण काही पदार्थ हे खरात सणावारांना बनवले जातात. त्यातली सगळ्यांची आवडीची डीश म्हणजे आली-पुरी.

सकाळी घरात दरवळणारा आलू पुरीचा सुगंध आणि गरमागरम नाश्त्याची चाहूल ही सगळ्यात भारी वाली फिलींग वाटते. आलू पुरी हा अनेकांचा आवडता भारतीय नाश्ता असला तरी ती नेहमीच डीप फ्राय असल्यामुळे आरोग्यासाठी थोडा असतो. आता तेलात तळण्याशिवायही चविष्ट आणि हलकी आलू पुरी बनवता येते, ज्यामुळे चव आणि आरोग्य यांचा उत्तम समतोल साधता येतो.

पारंपरिक पद्धतीत भरपूर तेलात तळलेल्या पुरीमुळे पोट जड होण्याच्या तक्रारी अनेकांना जाणवतात. यावर पर्याय म्हणून तव्यावर कमी तेलात शेकून बनवलेली हेल्दी आलू पुरी सध्या लोकप्रिय होत आहे. या पद्धतीत पुरी बाहेरून थोडी कुरकुरीत तर आतून मऊ राहते आणि थंडीच्या दिवसातही सहज पचते.

हेल्दी पुरीची रेसिपी

हेल्दी आलू पुरी बनवण्यासाठी दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून पूर्णपणे मॅश करा. त्यात चवीनुसार मीठ, थोडे काळे मीठ, ताजे दळलेले काळी मिरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करुन घ्या. दुसरीकडे पीठ चाळून त्यात थोडं मीठ घालून कणीक तयार ठेवा. तयार केलेले बटाट्यांचे मिश्रण हळूहळू कणकेत मिसळून मऊ, एकसंध पीठ मळा. हे पीठ खूप चिकट फार घट्ट नसेल याची काळजी घ्या.

आता तयार पीठाचे छोटे गोळे करून त्याच्या पुरी लाटा. पुरी जास्त पातळ न लाटता थोडी जाड ठेवा, जेणेकरून शेकताना ती थोडी फुगेल. मध्यम आचेवर तवा गरम करून त्यावर अगदी थोडे तेल किंवा तूप लावले जाते. पुरी तव्यावर दोन्ही बाजूंनी हळूहळू शेकली जाते. कमी आचेवर आणि हळूहळू शेकल्यामुळे पुरी छान सोनेरी रंगाची होते आणि जळत नाही. ही हेल्दी आलू पुरी दही, लोणचं किंवा ताज्या टोमॅटोच्या चटणीसोबत खाल्ल्यावर नाश्ता जास्त चवदार होतो. कमी तेलात तयार झाल्यामुळे हा नाश्ता लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी योग्य ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

Success Story: १०वी-१२वीत टॉपर; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; IFS आदिती यांचा प्रेरणादायी प्रवास

Nashik Accident: दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला हवं इच्छामरण; जीवंतपणीच्या मरणयातना कधी थांबणार? VIDEO

शिवसेनेच्या इतिहासावरून नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला; एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद पुन्हा पेटणार?

SCROLL FOR NEXT