हे सुपरफूड्स बारीक लोकांसाठी आहे वरदान, एका महिन्यात वाढवेल वजन  FreePik
लाईफस्टाईल

Health Tips: हे सुपरफूड्स बारीक लोकांसाठी आहे वरदान, एका महिन्यात वाढवेल वजन

Health: तुम्ही पण पातळ शरिरापासून त्रस्त आहात? तुमचे कपडे तुम्हालाच फीट बसत नाहीत? तुम्हाला अशक्त वाटं? मग आता घाबरण्याचे काही कारण नाही. फक्त तुमच्या डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुमचे शरिक खूप पातळ झाले असेल किंवा तुम्हाला अशक्त वाटत असेल, तर टेंशन घेण्याची गरज नाही. तुम्हा तुमच्या डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश करू शकता. जे लवकरात लवकर तुमचे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. वजन वाढवणे म्हणजे फक्त फॅट जमा करणे नाही, तर हेल्दी राहून शरिर मजबूत करणे आणि ताकद वाढवणे. तर मग जाणून घेऊया काही अशा खास पगार्थांबद्दल.

बारीक लोकांसाठी तंदुरुस्तीचा रहस्य

केळं: केळं हे अलं फळ आहे जे कार्बोहाइड्रेट आणि कॅलरिने परिपूर्ण आहे. जे लवकरात लवकर वजन वाढवण्याचे काम करते. केळं दुधासोबत खाल्यानं जास्त पोषण मिळतं आणि वजन वाढण्याची प्रक्रिया लवकर होते.

पूर्ण चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ:

पूर्ण चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दूध, पनीर, दही आणि तुप यांच्यात हेल्दी फॅट, प्रोटीन आणि कॅलशियम मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्ही पातळ असाल तर तुमच्या आहारात फुल फॅट दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ समाविष्ट करा. जर तुम्हाला लवकर वजन वाढवायचे असेल तर देशी तूप लोणीचा तुमच्या आहारात समावेश करा. ते रोटी, दलिया किंवा दुधात मिसळून खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि वजन लवकर वाढते.

एक महिन्यात तंदुरुस्त होण्याचे मंत्र

सुका मेवा: बदाम, काजू, अक्रोड आणि मनुका यांसारख्या सुक्या मेव्यात उच्ट कॅसरी आणि हेल्दी फॅट असतात. त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून खाल्यास शरिराला लवकर पोषण मिळते आणि वजन देखील लवकर वाढते.

बारीक लोकांसाठी निरोगी जीवनाची दिशा

बटाटा: बटाटा हा स्टार्च आणि कार्बोहायड्रेटचा एक उत्तम स्रोत आहे, जो स्नायूंमध्ये ग्लायकोजेन साठवून वजन वाढविण्यास मदत करतो. ते उकळून, भाजी म्हणून किंवा पराठे बनवून खाऊ शकता.

तंदुरुस्त शरीरासाठी सुपरफूड्स

अंडी: अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि हेल्दी फॅट असतात. दररोज २ ते ३ अंडी खाल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरिराला योग्य आकार मिळतो. अंडे हे शरिरातील काही अवयवांसाठी फायदेशीर असते.

सुपरफूड्सचा उपयोग करा आणि एक महिन्यात फिट व्हा

पीनट बटर: पीनट बटरमध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन आणि कॅसरिज असतात. जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. त्याला ब्रेड, स्मूदी किंवा थेट खाल्याने शरिराला एनर्जी मिळते.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT