Night Shift Side Effects Saam TV
लाईफस्टाईल

Night Shift Side Effects : नाईट शिफ्ट केल्याने तुम्हालाही होऊ शकतात 'हे' आजार; जाणून घ्या सविस्तर

Health Tips : रात्रीच्यावेळी झोपेत हा थकवा रिकव्हर होतो आणि आपल्याला फ्रेश वाटते. मात्र रात्रीची झोप न घेतल्याने आपल्या चेहऱ्यावर थकवा तसेच पिंपल्स देखील वाढतात.

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीची लाईफस्टाईल आता फार बदलली आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार व्यक्तीची झोपण्याची आणि जेवणाची वेळ सुद्धा बदलत चालली आहे. त्यामुळे याचा संपूर्ण परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत आहे. काही व्यक्ती 2 पैसे जास्त कमविण्यासाठी नाईट शिफ्ट देखील करतात. मात्र नाईट शिफ्ट आपल्या आरोग्यासाठी फार घातक आहे.

घरातील विविध आर्थिक जबाबदारीमुळे व्यक्ती कामामध्ये स्वतःला पूर्णतः झोकून देतात. सर्व काही डिजिटल झाल्याने प्रत्येकाचे काम लॅपटॉप किंवा कॉम्पुटरवर असते. अशात रात्रीच्यावेळी झोपण्याच्या वेळेत काम केल्याने त्या व्यक्तीला विविध व्याधी जडतात.

हृदयविकार

नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती रात्री उशिरा जेवण करतात. जेवणाला उशीर झाला की अन्न पचत नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या उद्भवतात. अपचन झाल्याने काही व्यक्तींना हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता असते.

वजन वाढते

अनियमित जेवणाचीवेळ असणे झोप पूर्ण न होणे यामुळे नाईट शिफ्ट करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात हार्मोन्सचे संतुलन राहत नाही. त्यामुळे देखील वजन वाढण्याच्या समस्या जाणवतात.

चेहऱ्यावर पिंपल्स येतात

आपले शरीर निरोगी आहे की नाही हे आपल्या चेहऱ्यावर देखील समजते. दिवसभर काम करून आपली स्किन चेहरा देखील थकलेला असतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी झोपेत हा थकवा रिकव्हर होतो आणि आपल्याला फ्रेश वाटते. मात्र रात्रीची झोप न घेतल्याने आपल्या चेहऱ्यावर थकवा तसेच पिंपल्स देखील वाढतात.

स्मरणशक्ती कमी होते

आपल्या शरिराप्रमाणे कामं करून आपला मेंदू देखील थकून जातो. थकवा जास्त आल्याने आपल्या स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. स्मरणशक्ती जास्त चांगली ठेवण्यासाठी आपल्याला रात्रीची झोप आवश्यक असते.

डिप्रेशन वाढते

ज्या व्यक्ती रात्रभर स्क्रिनवर काम करतात त्यांना डिप्रेशन जास्त येतं. मेंदू थकल्याने, झोप पूर्ण न झाल्याने अशा व्यक्तींची चिडचिड वाढते. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास व्यक्ती त्यावर अतिप्रमाणात विचार करतात. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये देखील जातात.

टीप : ही सामान्य माहिती आहे. नाईट शिफ्टसाठी साम टिव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

SCROLL FOR NEXT