Bharat Jadhav
अनेक लोक ८ ते ९ तास ऑफिसमध्ये बसून काम करतात. पण दररोज इतका वेळ बसून काम केल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
डेस्क जॉब असलेल्या लोकांना व्यायाम आणि शारीरिक हालचाली करण्यास सांगितले जाते.
एकाच जागी तासन् तास बसून काम करता तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात.
जास्त वेळ बसून काम केल्याने शरीरातील चरबी जळत नाही. लठ्ठपणा वाढू लागतो ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.
बराच वेळ बसून काम केल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होऊ शकते. यामुळे मधुमेह होऊ शकतो.
लोकांची शारीरिक हालचाली कमी होत असते. दीर्घकाळ असे केल्याने व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बराच वेळ बसून काम केल्यानेही व्यक्तीच्या डोळ्यांना त्रास होत असतो.
डेस्क जॉब असलेल्या लोकांनी त्यांची शारीरिक हालचाल वाढवली पाहिजे. मध्ये-मध्ये ब्रेक घ्या. स्ट्रेचिंग करू शकता.
येथे क्लिक करा