Health Tips Saam tv
लाईफस्टाईल

Health Tips: वयापेक्षा तरुण दिसायचंय, आहार अशा पद्धतीने घ्या...

मधुमेह आणि वाढतं वय या अशा दोन गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाला नियंत्रणात ठेवायची असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मधुमेह आणि वाढतं वय या अशा दोन गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाला नियंत्रणात ठेवायची असतात. पण, प्रत्यक्षात फार कमी लोक हे करू शकतात. या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे काही खूप सोपे मार्ग आहेत. यापैकी एक खाण्याची योग्य पद्धत. व्यक्ती जे खातोय तेच योग्य पद्धतीने खाल्ले तरच त्याचे वजन बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. इतकेच नाही तर त्याने तो त्याच्या वयापेक्षा अधिक तरुण दिसू शकतो (Health tips for controlling diabetes and increasing age).

वजन का वाढते?

सहसा लोक भाज्या-कोशिंबीर, प्रथिने (Proteins) जेवणासोबत किंवा जोवणानंतर खातात. त्यामुळे हार्मोन्स (Harmons) वर फरक पडतो आणि वजनही वाढते. जर कार्बोहायड्रेट्सच्या आधी भाज्या-प्रथिने खाल्ले तर ते इंसुलिन तसेच ग्लुकोजचे प्रमाण 30-40% कमी करते. न्यू यॉर्क शहरातील वेल कॉर्नेल मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, खाण्याच्या सामान्य पद्धतीमुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते.

अनेक वेळा संतुलित आहार (diet) घेतल्यानंतरही त्याचा पूर्ण परिणाम मिळत नाही. त्यामुळे अन्नपदार्थ (Food) योग्य क्रमाने खाणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच नेहमी जेवणाच्या सुरुवातीला भाज्या, कोशिंबीर-डाळ घ्या आणि त्यानंतर कार्बोहायड्रेट खा, म्हणजे तुमचं वजन वाढणार नाही.(टीप- वरील उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

कार्बोहायड्रेट्सपूर्वी प्रथिने आणि फायबर खाण्याचे फायदे -

🔸अशा प्रकारे अन्नाचं सेवन केल्यास हार्मोन्स संतुलित राहतात

🔹प्रजनन क्षमता चांगली होते

🔸त्वचा चांगली राहाते

🔹वास्तविक वयापेक्षा तरुण दिसता

🔸वजनही नियंत्रित राहते

🔹मधुमेह (diabetes) नियंत्रित राहते

(टीप- वरील उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

SCROLL FOR NEXT