मुंबई : वास्तुशास्त्रा (Vastushastra) मध्ये जीवनाशी निगडित गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आपल्या दिनचर्येतील काही छोट्या-छोट्या चुका आपल्या आर्थिक प्रगतीत अडथळा ठरतात. अज्ञानामुळे आपण अशी काही कामे करतो, ज्याचा परिणाम उत्पन्नाच्या स्त्रोतांवर होतो. त्यामुळे आर्थिक प्रगतीला ब्रेक लागतो. त्यामुळे बचत कमी आणि खर्च जास्त होतो (Vastu Tips These Things Bring Financial Crisis In Life).
वास्तूशी संबंधित कोणत्या गोष्टी आर्थिक प्रगतीत बाधा ठरतो जाणून घ्या -
1. घरात जेव्हाही झाडू लावाल त्यानंतर झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही. त्याचा अनादर करु नका. झाडुला देवी लक्ष्मी (Goddess Lakshami) चे प्रतीक मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. स्वच्छता होते (Vastu Tips).
2. घराच्या बागेत मोठी झाडे (Tree) लावू नका. बोन्साई झाडे आणि काटेरी झाडेही लावणे टाळा. ते नकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो.
3. लक्ष्मीजींच्या पूजेसाठी आपण मूर्ती किंवा चित्रांचा वापर करतो. परंतु लक्षात ठेवा की लक्ष्मीजींची मूर्ती किंवा चित्र समोरासमोर ठेवू नका. याचा परिणाम पैशांच्या आगमनावर होतो, असे करणे टाळावे.
4. तुमच्या स्वयंपाकघरात तुटलेली, फुटलेली किंवा तडे गेलेली भांडी असतील, तर ती बाहेर फेकून द्या. अशी भांडी वापरल्याने उत्पन्नावर परिणाम होतो. तसेच, रात्रीची उरलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका. फाटके आणि जुने कपडे वापरल्यानेही गरिबी वाढते.
5. जर तुमच्या घरात एखादे घड्याळ (Watch) बंद पडलेले असेल किंवा ते तुटले असेल तर ते दुरुस्त करून घ्या, अन्यथा ते घराबाहेर फेकून द्या. घड्याळ प्रगतीचे सूचक मानले जाते. घड्याळ थांबणे म्हणजे प्रगती (Success) थांबणे.
6. कधीकधी आपले पाकीट फाटते, पण तरीही आपण ते बदलत नाही. पर्स तुमच्या उत्पन्नाशी संबंधित आहे. पर्स चांगली असावी. फाटलेली किंवा खूप जुनी पर्स वापरू नये.
7. जर तुम्ही अंथरुणावर बसून जेवत असाल तर तुमची ही सवय बदला. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.
(टीप - येथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसाधारण धार्मिक मान्यता आणि माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक कारण नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांना सल्ला घ्या...)
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.