Chana Benefits  Saam TV
लाईफस्टाईल

Chana Benefits : दररोज सकाळी रिकाम्या पोटी 'खा' भिजवलेले चणे; महिनाभरात व्हाल तंदुरुस्त आणि बॉडीबिल्डर

Eat Soaked Chana : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चणे खाल्ले तर आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. चणे खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढतं.

Ruchika Jadhav

पाण्यात भिजवलेले चणे चवीला मस्त लागतात. दररोज सकाळी हेल्दी नाश्ता करण्यासाठी तुम्ही असे चणे उकडवून सुद्धा खाऊ शकतात. जर तुम्ही रोज रात्री एक मुठभर चणे भिजत ठेवले आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चणे खाल्ले तर आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. चणे खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढतं. तसेच अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. त्यामुळे आज चणे खाण्याचे ५ फायदे जाणून घेऊ.

अशक्तपणा कमी होतो

ज्या व्यक्ती कमजोर म्हणजेच अशक्त आहेत त्यांनी चणे खाल्ले पाहिजेत. चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला कॅल्शिअम, व्हिटॅमीन मिळते. चण्यांमध्ये लोह सुद्धा असते. सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तुम्ही चणे खाणे आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे.

हिमोग्लोबीन वाढते

अनेक मुलींमध्ये हिमोग्लोबीन कमी असते. हिमोग्लोबीन कमी असल्याने आपल्याला जास्त अशक्तपणा येतो. त्यामुळे हिमोग्लोबीनची कमतरता वाढवण्यासाठी तुम्ही चणे खाल्ले पाहिजेत. नॉनव्हेज न खाणाऱ्या व्यक्तींना हिमोग्लोबीनच्या समस्या जास्त असतात. त्यामुळे अशा व्यक्ती मुठभर चणे खाऊ शकतात. चणे खाल्ल्याने तुम्हाला दूध किंवा अंडी तसेच पनीर खाण्याची देखील गरज नाही.

हृदयविकाराच्या समस्या

सध्याच्या काळात प्रत्येक घरात एका तरी व्यक्तीला बीपी आणि शूगरच्या समस्या आहेत. शूगरच्या समस्यांवर मात करण्यासाठी चणे जास्त उपयुक्त आहेत. चणे खाल्ल्याने आपल्या शरीरात रक्त वाढते. ज्या व्यक्तींना ब्लॉकेजच्या समस्या आहेत त्या दूर होतात. त्यामुळे हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी चणे खाण्यास सुरुवात केली पाहिजे.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

त्वचा आणि केसांसाठी देखील चणे उपयुक्त आहेत. चणे खाल्ल्याने आपल्या स्किनवर ग्लो येतो. तर केस गळत असल्यास कमी होतात. केस गळू नयेत यासाठी तुम्ही काळे चणे आणि गूळ खाऊ शकता. काळे चणे आणि गूळ खाल्ल्यने महिलांना पाळी आल्यावर सुद्धा जास्त त्रास होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT