Benefits of milk, Protein, strong bones, Vitamin D ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Milk Substitute : दूधात हे पदार्थ घालून त्याचे सेवन करा, वाढेल हाडांची मजबूती व जीवनसत्त्व 'ड' चे पोषण

दूधात कोणते पदार्थ घातल्यास त्याची चव वाढेल जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : दूध हा कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे, जो मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे. दूधात अनेक पोषक घटक असताता जे आपल्या शरीरासाठी उत्तम असतात.

हे देखील पहा -

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूध प्यायला आवडत नाही. लहान मुले तर दुध पिताना नाक मुरडत असतात परंतु, दूध हा संपूर्ण आहार मानला जातो कारण त्यात कॅल्शियम व्यतिरिक्त सर्व पोषक घटक असतात जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहेत. दुधामध्ये प्रथिने, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि आयोडीन सारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे ए, ब -२ व ब -१२ यांचा समावेश आहे. दूधाचे सेवन केल्याने यामुळे हाडे मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयविकारांपासून संरक्षण होते, शरीर मजबूत होते, वजन वाढण्यास प्रतिबंध होतो, दात निरोगी राहतात, चेहऱ्यावर चमक येते, तणाव दूर होतो आणि चांगली झोप येते. मुलांना दूधात हे पदार्थ घालून दिल्यास ते दूध पिण्यास नाटक करणार नाही व त्यांच्या हाडांची मजबूती वाढेल.

१. आपल्याला पॅकेज किंवा गाई-म्हशीचे दूध प्यायला आवडत नसेल तर, बदामाचे दूध आपण पिऊ शकतो. बदामाचे दूध सोया किंवा डेअरी दुधापेक्षा वेगळे आहे. यात कॅलरी व प्रथिने कमी प्रमाणात असतात. हे दूध पातळ असल्यामुळे यातील कॅलरीजचे प्रमाणही कमी असते.

२. स्वयंपाकातील (Kitchen) एखाद्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण नारळाच्या दूधाचा वापर करतो. यांचा वापर आपण पिण्यासाठी करु शकतो. हे दूध भाज्यांपासून ते भाज्यांचे सूप, स्मूदीज, चिया सीड पुडिंग आणि अगदी आईस्क्रीमपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरले जाऊ शकते.

३. हेल्प सीड्स मिल्क हे भांगाच्या बियापासून बनवले जाते. यात कर्बोदते कमी व चरबी जास्त असते. याशिवाय यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. फक्त एका ग्लास दुधापासून तुम्ही ५०% अल्फा-लिनोलेनिक ऍसिड मिळवू शकता. हे दूध ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे.

४. काजूच्या दुधाला किंचित गोड चव असते. याचा वापर आपण आहारातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये करचो. यात अधिक चरबी वाढवणारे घटक असतात. उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांसाठी हे दूध (Milk) फायदेशीर असेल. काजूच्या दुधात प्रति कप फक्त दोन ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT