Palm Oil Side Effects in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Palm Oil Side Effects: महिलांनो,पाम तेल हृदयासाठी घातक! स्वयंपाक करताना वापर करणे टाळाच

Side Effects Of Palm Oil on Health (in Marathi): बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागली आहे. परंतु, या जंकफूड किंवा स्ट्रीट फूडमध्ये कोणत्या प्रकारचे तेल वापरले जाते हे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही.

Manasvi Choudhary

Disadvantages On Palm Oil:

बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागली आहे. परंतु, या जंकफूड (Junk Food) किंवा स्ट्रीट फूडमध्ये कोणत्या प्रकारचे तेल वापरले जाते हे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही.

जास्त तेलकट आणि तिखट अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीराचे आरोग्य(Health) बिघडते. तसेच लठ्ठपणा वाढल्याने अनेक गंभीर समस्याचा सामना करावा लागतो. जर तुम्हीदेखील खाण्यासाठी हवाबंद पॅकेटमधील पदार्थाचे सेवन करत असाल तर तुम्हालाही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. या पदार्थामध्ये वापरण्यात येणारे तेल हे आरोग्यासाठी खरंच योग्य आहे का हे जाणून घ्या.

अन्नदार्थामध्ये सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणाऱ्या पाम तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. सॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते जे शरीराच्या हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहे.

सध्या वयोवृध्दांसह तरूण वर्गामध्ये हृदयाशी संबंधित समस्या दिसून येत आहे. ताणतणाव, झोप न येणे, खाण्या-पिण्याच्या वेळा न पाळणे या सवयी देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.

कमी किंमतीत उपलब्ध असणारे पाम तेल पॅकबंद खाद्यपदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तेलकट पदार्थामध्ये पाम तेलाचा वापर सर्वाधिक असल्याने आरोग्य तज्ज्ञांकडून देखील असे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जात आहे. असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते ज्यामुळे अत्यंत लहान वयात देखील तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

पाम तेलयुक्त पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर होतात परिणाम:

कोलेस्टेरॉल वाढते

पाम तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते जे खराब कोलेस्टेरॉल वाढवते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

रक्तातील लिपिड्सवर परिणाम

अतिरिक्त चरबी एलडीएलमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते यामुळे रक्तातील लिपिड्सवर परिणाम होतो. रक्तवाहिन्या कडक होतात आणि रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात ज्यामुळे पचन,थकवा अशा समस्यांना उद्भवतात.

शरीराला सूज येते

पाम तेलामध्ये संयुगे असतात जे शरीरातील जळजळ वाढवते. शरीराला सूज आल्याने हृदयविकाराचा धोका वाढवतो.

वजन वाढते

पाम तेल वापरून पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते ज्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग होण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahindra-Maruti Cars: स्वस्त किंमतीत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार, महिंद्रा आणि मारुतीची बाजारात होणार धमाकेदार एंट्री

Maharashtra Live News Update : भाजपचा कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gautami Patil : नाकात नथ अन् गुलाबी साडी; गौतमी पाटीलच्या नखरेल अदा, पाहा PHOTOS

Ambernath: नालेसफाईची तक्रार केल्याचा राग, भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', धाड टाकत पोलिसांकडून वेश्या व्यावसायाचा भंडाफोड; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT