Early Periods  Saam TV
लाईफस्टाईल

Early Periods : 9 ते 10 वर्षांच्या मुलींना मासिक पाळी येऊ लागली; वाचा धक्कादायक कारण

Early Periods in Girls : अनेक मुलींना कमी वयात म्हणजे अगदी ९ ते १० वर्षांतच मासिक पाळी येण्यास सुरुवात होत आहे. असं होण्यामागचं कारण काय आहे यावर एक संशोधन समोर आलंय.

Ruchika Jadhav

मासिक पाळी येणे हे प्रत्येक मुलीसाठी महत्वाचे आहे. मासिक पाळी मुलींना प्रत्येक महिन्यात येते. मासिक पाळी आल्यावर त्यांना बराच त्रास होतो. मात्र कितीही त्रास झाला तरी महिलांना दर महिन्यात मासिक पाळी यायलाच हवी. अशात बदलत्या जीवनशैलीने आणि अन्न धान्याच्या सेवनामुळे मुलींना फार कमी वयात मासिक पाळी येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

लहान मुलींना येतेय मासिक पाळी

मासिक पाळी येण्याचे योग्य वय १२ ते १३ वर्षे आहे. मात्र गेल्या काही वर्षांत अगदी ९ ते १० वर्षांच्या मुलींना सुद्धा मासिक पाळी येत आहे. इतक्या कमी वयात मुलींना पाळी आल्याने पुढील आयुष्यात त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो असं आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत.

कारण काय?

मुलींना कमी वयात पाळी येण्याची बरीच कारणे समोर आली आहेत. एका अभ्यासातून अशी महिती मिळालीये की, रोजच्या वापरातील काही प्रोटक्ट्समध्ये केमिकल्स असतात. मुली या वस्तूंच्या संपर्कात अल्यास त्यांना लवकर मासिक पाळी येण्यास सुरूवात होते.

साबनापासून सेंटपर्यंत सर्वच घातक?

मुली वापरत असलेल्या घातक वस्तुंमध्ये डिटर्जंट, सेंट, साबन यांसह सुगंधी मास्कचा देखील समावेश आहे. इंडोक्रिनोलॉजीमध्ये छापण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, कोलीनर्जिक एगोनिस्ट या नावाचं औषध सद्धा लवकर पाळी येण्यास कारणीभूत आहे. यात 'हार्मोन-डिसरपटर्स' आणि 'एंडोक्राइन-डिसरपटिंग' असं सुद्धा म्हटलं जातं. औषधातील या गुणधर्मांमुळे मुलींना लवकर मासिक पाळी येण्यास सुरूवात होते.

या मुलींना येते लवकर मासिक पाळी

यूएस नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) च्या संशोधकांनी तब्बल 10,000 एनवायरनमेंटल कम्पाउंडची तपासणी केली आहे. यामध्ये असं समोर आलं आहे की, लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. अगदी कमी वयात मुलांसह मुलींचे वजन वाढत आहे. वजन वाढल्यानेच मुलींना वेळेच्या आधी पाळी येत असल्याचं या संशोधनात म्हटलं आहे.

लहान मुलींमध्ये ताण तणाव सुद्धा फार वाढला आहे. तणाव वाढल्याने मुलींच्या शरीरातील हार्मोन्स सुद्धा बदलतायत. त्यामुळे सुद्धा मुलींना कमी वयात पाळी येण्यास सुरूवात होत आहे. त्यासह वातावरणातील प्रदूषण जास्त प्रमाणात वाढत आहे. प्रदूषण वाढत असल्याने देखील मासिक पाळी येण्याचं प्रमाण वाढल्याचं म्हटलं जातंय.

उपाय काय करावे?

आपल्या लहान मुलींबरोबर सुद्धा असं घडू नये यासाठी पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. मुलींच्या आहारासह एक्सरसाइज आणि झोपेवर लक्ष दिलं पाहिजे. मुलींवर कोणत्याही कारणामुळे ताण वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT