Causes of excessive thirst during sleep Hospital magexine/onlymyhealth
लाईफस्टाईल

Night Thirst: रात्री झोपेतून उठून वारंवार पाणी पिताय? तुम्हाला आजार तर नाही ना? वाचा

Constant Thirst : बऱ्याच लोकांना रात्री झोपल्यानंतर घशाला कोरड पडते. झोप मोड करून उठून सारखं पाणी प्याव लागतं. ही सवय सामान्य नसून डायबिटीज किंवा किडनीच्या आजारांचे कारण बनू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Know Why You Feel Excessively Thirsty at Night : काहीजण रात्री झोपल्यानंतर घशाला कोरड पडते म्हणून सारखं उठून पाणी पितात. त्यांना सारखं लघवीला जावं लागतं. ही एक सामान्य सवय आहे किंवा हे जेवताना जास्त पाणी प्यायल्यामुळे होतं असं म्हणून याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आत्ताच सावधान व्हा. कारण, ही सामान्य वाटणारी सवय गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. याला नॉक्टूरिया (Nocturia) किंवा पॉलिडिप्सिया (Polydipsia) असे म्हटले जाते. याबाबत डॉक्टर काय म्हणतात जाणून घेऊया.

झोपल्यानंतर जास्त तहान लागणे हे सामान्यत: वातावरणातील बदल, आहारात बदल यामुळे होते. तुमच्या आजूबाजूला कोरडे किंवा गरम वातावरण असल्यास, तुमच्या त्वचेतून आणि श्वसनमार्गातून पाण्याची वाफ होऊन पातळी कमी होते. ज्यामुळे तहान लागते. तसेच खारट किंवा मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरिरात पाण्याची गरज वाढते आणि सारखं पाणी प्यावसं वाटतं. जयपूर येथील नारायणा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण गुप्ता यांच्या मते, असे वारंवार होत असेल तर, हे डिहायड्रेशन, डायबिटीज किंवा किडनी संबंधित आजाराचे कारण बनू शकते.

आपल्या शरीरातील ब्लड शुगरची पातळी वाढली असता, शरीर अतिरिक्त ग्लूकोज लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. यामुळे सारखी लघवी लागते आणि डिहाड्रेशन होते. शरीराला सारखी पाण्याची गरज भासते. हे टाइप २ मधूमेहाचे लक्षण आहे. शिवाय मधूमेह इन्सिपिडस या स्थितीत, शरीरीत पुरेसे अॅन्टिडाययूरेटिक हार्मोन (Antiduretic Harmone) तयार होत नाहीत, ज्यामुळे जास्त प्रमाणात लघवी होते आणि तहान लागते. तसेच शरीरीत पाण्याची पातळी सतत खालावत असेल तर इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडून क्रोनिक किडनी डिजीज होण्याची शक्यता असते.

यापासून वाचण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा :

१. तुम्हाला जास्त तहान लागत असल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा आणि मधूमेहाची चाचणी करून घ्या.

२. रात्रीच्या वेळी पुरेसे पाणी प्या, पण जास्त प्रमाणात नाही.

३. खारट आणि मसालेदार पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करा.

४. तुमच्या खोलीतील तापमान नियंत्रित ठेवा.

५. पुरेशी झोप घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Clash : शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला,किंमत मोजावी लागेल; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर छावा संघटना आक्रमक

Ice Massage On Face: बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या

Baramati News: बारामतीत दुचाकी जळून खाक; परिसरात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: विजय घाडगे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार

Salher Fort : ट्रेकिंग प्रेमींनो! सह्याद्रीतील उंच शिखरावरचा शौर्याचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याला भेट दिलीत का?

SCROLL FOR NEXT