Chicken Shawarma Saam tv
लाईफस्टाईल

Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

Health expert on Chicken Shawarma : रस्त्यावर उघड्यावर विक्री केले जाणारे हे फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक आहे, असे नानाविविध प्रश्न लोकांना उपस्थित झाले आहेत.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

पुणे : अलीकडे प्रसिद्ध झालेला शोरमा पदार्थ खाल्ल्याने आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेला हा पदार्थ जीवघेणा ठरू लागल्याने सर्वत्र एकच भीती पसरली आहे. मुंबईतील तरुणाच्या मृत्यूच्या घटनेने शोरमाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. शोरमा खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन काही जणांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनेमध्ये मुंबईतील घटनेने आणखी भर पडली आहे. रस्त्यावर उघड्यावर विक्री केले जाणारे हे फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक आहे, असे नानाविविध प्रश्न लोकांमध्ये उपस्थित झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी शोरमा खाल्याने केरळच्या कोचीमधील २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. या तरुणीला अन्नातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, शोरमा खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्यानंतर तिचे एक-एक अवयव निकामी झाले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा घटना आतापर्यंत देशातील विविध शहरात घडल्या आहेत.

आता मुंबईतही शोरमा खाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर विकला जाणाऱ्या शोरमा पदार्थाविषयी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

शोरमा पदार्थ मूळचा कोणत्या देशाचा आहे?

शोरमा पदार्थ हा मूळात टर्किश देशातील पदार्थ आहे. या शोरमामध्ये मसालेदर चिकन, इतर मांस असतं. दिल्ली,मुंबईसहित अनेक शहरी भागात लोक हा पदार्थ आवडीने खातात. ६० ते १०० रुपयांपासून या शोरमाची सुरुवात होते. या शोरमामध्येही अनेक प्रकार आहेत. मात्र, स्वस्तात भूक भागवणारा हा पदार्थ जीवघेणा ठरत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

शोरमा सारख्या फास्टफूड पदार्थाविषयी तज्ज्ञांचं मत काय?

आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी याविषयी भाष्य केलं आहे. डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले,'मुळातच आरोग्याच्या दृष्टीने बाहेरच खाणे उघड्यावरचे पदार्थ खाणं हे धोकादायक असतं. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि सध्याचा जो उन्हाळा आहे की, सतत 40 अंशाच्यावर तापमान जात आहे. हे उघड्यावरील पदार्थ, शिजवलेले पदार्थ ,गोड पदार्थ, बासुंदीसारखे पदार्थ किंनवा मिठाई सारख्या पदार्थात ठराविक प्रकारचे रोगजंतू मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे अन्नातून विषबाधा सारख्या घटना घडतात'.

'अन्नातून विषबाधा हा एक प्रकारचा आजार आहे. अन्नपदार्थामध्ये विषाणू जिवाणू तयार होतात. तसेच वाढतात. असे पदार्थ खाल्ल्याने आतड्याला सूज येते, त्यानंतर लगेच उलट्या, जुलाब होतात. अगदी पाण्यासारखे जुलाब होतात. डिहायड्रेशन होताच रक्तदाब कमी होतो. त्यानंतर व्यक्ती गंभीर स्वरुपात जातो, कारण उघड्यावरील अन्नपदार्थ कायमच अतिशय निकृष्टदर्जाचे असतात. एक तर लोकांनी हे खाऊ नये. प्रत्येक शहरांमध्ये अन्न औषध प्रशासनाने त्यांची तपासणी करून या लोकांना विकण्यास परवानगी न देणे हे सर्वात महत्वाचं आहे, असे डॉ. अविनाश भोंडवे पुढे म्हणाले.

शोरमा खाण्याची खूपच इच्छा झाली, तर काय काळजी घ्याल?

शोरमा खाण्यासाठी जात असाल, त्या स्टॉल आणि दुकानाची स्वच्छता पाहाल. शोरमासाठी वापरण्यात येणारे मांस व्यवस्थित शिजवलं का, हे तपासून घ्याल. मांस शिजवण्यासाठी साधारण 165°F (74°C) इतकं तापमान लागतं. कारण या तापमानात मांसामधील बॅक्टेरिया नष्ट होतात.

शोरमाची विक्री अधिक ज्या दुकान, हॉटेलमध्ये होते, तेथून शोरमा खरेदी करण्याचा विचार करावा. रुममध्ये अधिक उष्णता असलेल्या वातावरणात शोरमा खाणे टाळावे. कच्चे मांस आणि अर्ध शिजलेल्या मांसांचा वापर करून तयार करण्यात आलेला शोरमा खाणे टाळावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT