सकाळी सकाळी अनेक लोकांना चहा पिण्याची सवय असते. अनेकांना सकाळच्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने करण्याची सवय असते. काहींना दूधाचा चहा आवडतो तर काहींना ब्लॅक टी.
जगात अनेक लोकांना चहा खूप आवडतो. परंतु चहा प्यायल्याने शरीरास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक चहाच्या पिण्याच्या पर्यायांकडे वळतात. यात अनेक प्रकारचे घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात ग्रीन टी, हर्बल टी, गवती चहा अशा अनेक पेयांचा समावेश होतो. हे पेय प्यायल्याने मन प्रसन्न आणि फ्रेश होते. त्याचसोबत आरोग्यासदेखील मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पेयांची माहिती देणार आहोत. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. ग्रीन टी
चहाऐवजी तुम्ही सकाळी ग्रीन टी पिऊ शकतात. ग्रीन टीमध्ये खूप जास्त अँटीऑक्सिडंट आणि पोषक तत्वे असतात.ग्रीन टी पिल्याने वजन कमी (Weight Loss ) होण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्यास खूप फायदे होतात.
2. पुदिन्याचा चहा
पुदिना ही एक औषधी वनस्पती मानली जाते. त्यात अनेक प्रकारचे गुणधर्म असतात. पुदिन्याचे सेवन केल्यास पचनक्रिया व्यवस्थित काम करते. त्यामुळे रोज तुम्ही पुदिन्याचा चहा पिल्यास आरोग्यास (Health) फायदा होईल.
3. आल्याचा चहा
आल्यात अनेक पोषक तत्वे असतात. सकाळी आल्याचा चहा प्यायल्याने दिवसाची सुरुवात प्रसन्न होते. त्यामुळे फक्त मनाला नाही तर शरीरालादेखील फायदे होतात.
4. हळदीचे पाणी
हळदीचे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो.याचसोबत यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.तसेच हळदीचे पाणी पिल्याने त्वचादेखील छान होते. त्यामुळे अनेक आजार दूर राहतात.
5. दालचिनी चहा
दालचिनीमध्ये अनेक गुमधर्म असतात. दालचिनीमुळे शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे सकाळी दालचिनीचा चहा पिल्याने खूप फायदे होतात.
6. अश्वगंधाचा चहा
अश्वगंधाचा चहा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. अश्वगंधाचा चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे अनेक आजार दूर होतात.अश्वगंधा चहा केवळ तणाव कमी होते. तर त्याचसोबत मेंदूला तीक्ष्ण बनवण्यास मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.