झोपडपट्टीच्या पुर्नविकासाला सुरुवात होऊन मुंबई सारख्या शहरीकरणाला वेग येत आहे. अशातच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बांधकामाला सुरुवात झाली आहे. उंच उंच इमारती, कोस्टल रोड प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रो यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना सरकारने मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सर्वत्र धूळ आणि प्रदूषणाचे वातावरण दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई सारख्या शहरात प्रदूषणात वाढ झालेली पाहयाला मिळाली. हवामानाची संपूर्ण स्थिती पाहाता मुंबई शहराला बांधकामाच्या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शहरातील अनेक गोष्टींचे विकासात रुपातंर होऊन बांधकाम, कचरा जाळणे आणि वाहनातून (Vehicle) निघणाऱ्या धुरामुळे हवेतील AQL एक्सेप्टेबल कॉलिटी लेव्हल कमी झाले आहे. याबाबतची माहिती SAFAR चे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रकल्प संचालक गुफ्रान बेग यांनी दिली. ते म्हणतात की, मुंबई (Mumbai) सारख्या शहरात ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे त्या ठिकाणी AQL कमी प्रमाणात नोंदवली जाण्याची शक्यता आहे.
हवेत तयार होणारे घातक घटक आरोग्यावर परिणाम करतात. हे कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊन मोठ्या वायुमार्गात जमा होतात. बांधकामात वापरले जाणारे सिमेंट, वाळू, दगड, लाकूड आणि इतर रसायने श्वसनावर (Breath) परिणाम करतात. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
धुळीमुळे फुफ्फुसांचा त्रास, जळजळ आणि अस्थमा सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे सतत गरगरणे आणि खोकला येणे यासारखी लक्षणे मोठ्या आणि लहान मुलांमध्ये दिसून येत आहे.
ग्लोबल हॉस्पिटल्स विभागाचे संचालक समीर गार्डे म्हणतात की, सिमेंटच्या वापरामुळे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड्स (NOx), आणि वाष्पशील सेंद्रिय संयुगे (VOCs)सारखे घातक रसायन बाहेर पडतात. जे श्वसमार्गासाठी अधिक हानिकारक असतात. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो किंवा श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागते.
बांधकामाच्या धुळीमुळे खोकला, श्वासोच्छवास घेण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. लहान मुले हे अंदाजे प्रति मिनिटाला ३० ते ६० वेळा श्वास घेतात. पाच वर्षांच्या मुलांचा श्वसनाचा वेग हा २० ते ३० वेळा प्रति मिनिट असतो. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर दररोज धुळीच्या संपर्कात असल्याने गंभीर परिणाम होतो. त्यामुळे त्याच्या हृदयावर आणि श्वसनावर परिणाम होताना दिसून आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.