Health Alert  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Alert : वर्कआउट करताय? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतो शरीरावर विपरीत परिणाम

वर्कआउट करताना काय काळजी घ्याल?

कोमल दामुद्रे

Health Alert : बहुतांश लोकांना सेलिब्रेटीस् सारखी फिट बॉडी हवी असते. त्यामुळे लोकांना वर्कआउट करणे महत्वाचे वाटते, म्हणुन रात्रंदिवस लोकं मेहनत करतात.

सेलिब्रेटीस् सारखी फिट बॉडी मिळवण्यासाठी कठीण वर्कआउटची गरज नसून डाएट प्लॅन आणि नियमांचे पालन सुध्दा महत्वाचे आहे. प्रत्येक सेलिब्रेटी हा वैयक्तिक फिटनेस ट्रेनर आणि आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम आणि डाएट घेत असतो.

वर्कआउट अतिप्रमाणात केला तर शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. गेल्यावर्षी सिध्दार्थ शुक्ला याला हृदयविकाराचा झटका आला, गेल्या महिन्यात दूरदर्शन अभिनेता दीपेश भान याची क्रिकेट खेळताना मेंदूतील रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले आणि आता आठवड्याभरापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. सध्या अशा घटना झपाट्याने वाढत आहेत.

तंदुरुस्त दिसण्याच्या हव्यासापोटी सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य तरुणांपर्यंत वर्कआउट करण्याचा आणि स्नायू वाढवणाऱ्या औषधांच्या सेवनाचा ट्रेंड वाढला आहे. म्हणजेच शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व सर्वांनाच कळाले आहे, मग एवढं करूनही आरोग्याशी संबंधित अशा घटना का घडतायत ?

निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार (Food) घेणे, वेळेवर झोपणे, ताणतणावांपासून दूर राहणे आणि वर्कआउट करणे आवश्यक आहे, परंतु सर्व काही वेळेवर केले तरच त्याचा फायदा होतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी न्याहारी, सकाळी अंथरुण सोडण्याच्या वेळी झोप आणि अशा परिस्थितीत तणाव वाढला की औषधे घेणे. वर्कआउट करुन आपण बाहेरून फिट राहतो, पण आतून आपले शरीर पोकळ राहते.

वर्कआउट (Workout), झोप, जेवण इत्यादींच्या वेळा ठरलेल्या असतात. जेव्हा या गोष्टी वेळेवर होत नाहीत तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो आणि अचानक त्यांचे कार्य करणे थांबते.

निरोगी राहायचे असेल तर निसर्गासोबत चालावे लागेल. तुमची दिनचर्या व्यवस्थित करा आणि सर्व काही वेळेवर करा. वर्कआउट ऐवजी योगा आणि व्यायाम करा. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि हार्मोन्स नियंत्रित राहतील आणि अशा घटनांची शक्यता कमी होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT