आजकाल सर्वत्र प्रवासादरम्यान किंवा फावला वेळ मिळताच हेडफोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फोनकॉल, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे अशा असंख्या गोष्टी आपण हेडफोनच्या साहाय्याने करतो.
हेडफोनचा वापर सोयीस्कर पडतो. पण जास्त काळ हेडफोन कानाला लावल्यास कानाचे आरोग्य धोक्यात येते.
हेडफोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन मेंदूतील टिश्यूसाठी घातक ठरतात. परिणामी ब्रेन कॅन्सरचा धोका वाढतो.
हेडफोन लावून मोठ्या आवाजात तुम्ही गाणी ऐकत असाल तर निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे कानाचे पडदे खराब करतात. त्यामुळे हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणे ऐकणे बंद करा.
हेडफोनच्या रेडिएशनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तसेच कानाची पाळी देखील दुखू लागते.
नेहमी हेडफोन स्वतःचे वापरावे, इतरांचे हेडफोन वापरल्यास कानाला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
दीर्घकाळ हेडफोनवर गाणी ऐकल्यास मेंदूच्या नसा खेचल्या जातात. याचा स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो.
हेडफोनवर सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास बहिरेपणा येऊ शकतो. आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता खूप नाजूक असते.
हेडफोनच्या रेडिएशन्समुळे थकवा, डोकेदुखी, अपूरी झोप इत्याही समस्या उद्भवतात. तसेच कोणत्याही कामात एकाग्रता राहत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.