Hartalika Vrat Katha Saam Tv
लाईफस्टाईल

Hartalika Vrat Katha : हरतालिकेचा उपवास करताय? या व्रताचे महत्त्व सांगणाऱ्या पौराणिक कथेचे करा वाचन

Shraddha Thik

Hartalika Vrat :

आज सोमवार 18 सप्टेंबर रोजी हरतालिकेचा उपवास आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. हे व्रत केल्याने महादेव शिव आणि माता पार्वतीची कृपा होते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील अतूट नाते लक्षात घेऊन हरतालिका हा सण (Festival) साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करून महादेव आणि माता पार्वतीची पूजा करतात आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करतात. तसेच मग हरतालिका व्रताची कथा ऐकल्याने तुम्ही जीवनीत सुखी होतात.

फक्त हरतालिक व्रताची कथा ऐकल्याने व वाचल्याने भगवान शिव (Shiv) आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सुख, शांती आणि समृद्धी वाढते. ही कथा अत्यंत पवित्र मानली जाते, म्हणून हरतालिकी व्रताची कथा या दिवशी अवश्य ऐकावी व वाचावी.

हरतालिका व्रताच्या कथेनुसार, माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हिमालयातील गंगेच्या तीरावर तोंड करून कठोर तपश्चर्या केली. यावेळी त्यांनी अन्न सोडले होते. कोरडी पाने चघळण्यात बराच वेळ घालवला आणि बरीच वर्षे फक्त श्वासाने एकाग्र होण्यात त्यांनी आपला वेळ घालवला. माता पार्वतीची अशी अवस्था पाहून तिचे वडील फार दुःखी झाले.

दरम्यान, महर्षी नारद हे माता पार्वतीच्या वडिलांकडे पोहोचले आणि भगवान विष्णूच्या वतीने त्यांनी पार्वतीजींना लग्नाचा प्रस्ताव ठेवला, जो पार्वतीच्या वडिलांनी लगेच स्वीकारला. जेव्हा वडिलांनी कन्या पार्वतीला आपल्या लग्नाबद्दल सांगितले तेव्हा माता पार्वतीला खूप वाईट वाटले आणि मोठ्याने शोक करू लागली.

मग जेव्हा मात पार्वतीच्या मैत्रिणीने (Friend) तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले तेंव्हा माताने तिला सांगितले की ती भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर व्रत पाळत आहे, तर तिच्या वडिलांना तिचा विवाह श्री विष्णूशी करायचा आहे. मग मैत्रिणीच्या सांगण्यावरून माता पार्वती घनदाट जंगलात गेली आणि एका गुहेत शिवपूजेत लीन झाली.

हस्त नक्षत्रातील भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला माता पार्वतीने वाळूपासून शिवलिंग बनवले आणि भोलेनाथांच्या स्तुतीमध्ये लीन होऊन ती रात्री जागरण करू लागली. त्यानंतर मातेच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले.

असे मानले जाते की या दिवशी ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पती प्राप्त होतो. तसेच हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सदैव सुख-समृद्धी राहते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

SCROLL FOR NEXT