Happy Dussehra 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Happy Dasara Wishes: सोनं घ्या सोनं..., दसऱ्यानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या WhatsApp, Facebook च्या माध्यमातून खास शुभेच्छा

Vijayadashmi 2023: तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवणार असला तर हे कोट्स Facebook, WhatsApp च्या माध्यामातून तुम्ही त्यांना पाठवू शकता.

कोमल दामुद्रे

Dasara 2023 Message In Marathi:

हिंदू धर्मात विजयादशमीला अधिक महत्त्व आहे. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी लंकापती रावणाचा वध करण्यात आला होता. तसेच वाईटाचा नाश करुन सत्याचा विजय होतो असे मानले जाते.

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते. यंदा हा सण २४ ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. अशातच जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवणार असला तर हे कोट्स Facebook, WhatsApp च्या माध्यामातून तुम्ही त्यांना पाठवू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. आपट्याची पाने, झेंडुची फुले,

घेवूनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ दिनी,

सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..

दसरा सणानिमित्त आपणास व

आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

2. श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा

नाश करत

दसरा साजरा करूया..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

3. उत्सव आला विजयाचा,

दिवस सोनं लुटण्याचा,

नवं जुनं विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा,

तोरणं बांधू दारी,

घालू रांगोळी अंगणी,

करू उधळण सोन्याची (Gold),

जपू नाती मना मनांची..

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. पहाट झाली दिवस उजाडला,

आला आला सण दसऱ्याचा आला,

अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,

उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..

आपणास व आपल्या परिवारास

विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

5. तोरणं बांधू दारी,

घालू रांगोळी अंगणी,

करू उधळण सोन्याची,

जपू नाती (Relation) मना मनांची..

विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

6. "आला आला दसरा,

दुःख आता विसरा

चेहरा ठेवा हसरा,

साजरा करु दसरा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"

7. "उत्सव आला विजयाचा

दिवस सोने लुटण्याचा..

नवे जुने विसरुन सारे,

फक्त आनंद वाटण्याचा..

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा."

8. तुमच्या कर्तुत्वाला,

पुन्हा एक नवी दिशा..

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत नव्या शुभेच्छा."

9. "आपट्याची पानं त्याला

हृदयाचा आकार,

मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,

तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार,

दसऱ्या (Dussehra) निमित्त करावा

शुभेच्छांचा स्वीकार."

10. आनंदाचा सण,

प्रेमाचा वर्षाव..

गोडाचा प्रकार,

दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT