Happy 75th Republic Day 2024 Wishes Saam Tv
लाईफस्टाईल

Happy 75th Republic Day 2024 Wishes : रंग बलिदानाचा, रंग शांततेचा..., प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा!

Happy Republic Day 2024 : यंदा भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले.

कोमल दामुद्रे

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा in Marathi :

यंदा भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणूनही साजरा (Celebrate) केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले.

२६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. त्यामुळेच या खास दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic day) लोक एकमेकांना मेसेज पाठवून शुभेच्छा देतात. यादिनानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसला प्रजासत्ताकदिनानिमित्त स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.

1. वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,

वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे,

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

2. स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश

आम्ही सारे एक, जरी नाना जाती नाना वेष

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

3. सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा,

सैनिकांचा आहे आम्हाला अभिमान,

प्रजासत्ताक दिनी गातोय आम्ही त्यांचे गुणगान।

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

4. स्वतंत्र आमच्या मनात

ताकत आमच्या शब्दात

शुद्धता आमच्या रक्तात

स्वाभिमान भारतीय असण्याचा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. देश विविध रंगांचा

देश विविध ढगांचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

6. उत्सव तीन रंगाचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडवला

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

7. घे तिरंगा हाती

नभी लहरू दे उंच उंच

जयघोष मुखी

जय भारत जय हिंद

गर्जु दे आसमंत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. तनी-मनी बहरुदे नव-जोम,

होऊ दे पुलकित रोम-रोम

घे तिरंगा हाती,

नभी लहरु दे उंच उंच..

जयघोष मुखी,

जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT