Shraddha Thik
भारत यंदा 76 वा प्रजासत्ता दिन साजरा करणार आहे.
या प्रजासत्ता दिनानिमित्ताने भारताची शान आपल्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली ते माहित करून घेऊया
भारतीय राष्ट्रध्वजाचे आद्य रचनाकार पिंगली वेंकय्या हे आहेत. यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 रोजी तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला.
त्यांनी मछलीपट्टणम येथे हिंदू हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण आणि मद्रासमधून माध्यमिक शिक्षण घेतले.
अवघ्या 19 व्या वर्षी ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये सहभागी झाले. दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धादरम्यान ते लष्करात असताना महात्मा गांधींना भेटले होते. गांधीजींना भेटून ते इतके प्रभावित झाले की ते कायमचे भारतात परतले आणि स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले.
त्यांनी महात्मा गांधीना आपला स्वत:चा राष्ट्रध्वज असावा असं सांगितलं यावर गांधीजीनी राष्ट्रध्वजाची रचना करण्यास मान्यता दिली. भारताचा ध्वज कसा असावा याचा सखोल अभ्यास करून तिरंगा साकारला.
पिंगाली यांनी 1916 ते 1921 या 5 वर्षात जगभरातील 30 देशाच्या ध्वजांचा अभ्यास केला यानंतर 1921 मध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याची रचना केली.
शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला.