Halloween 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Halloween 2022 : हॅलोविनचा भोपळ्याशी काय संबंध आहे? जाणून घ्या, 'या' सणात भितीदायक कपडे का घालतात ?

हल्ली भूत पार्टी किंवा त्याच्या संबंधित अनेक ट्रेंड फॉलो केले जातात पण हा हॅलोविन डे नेमका आहे तरी काय?

कोमल दामुद्रे

Halloween 2022 : हॅलोवीन हा पाश्चात्य देशांतून ऑक्टोबर ३१ला साजरा करण्यात येणारा सण. तुम्हाला प्रश्न पडला असेल हल्ली भूत पार्टी किंवा त्याच्या संबंधित अनेक ट्रेंड फॉलो केले जातात पण हा हॅलोविन डे नेमका आहे तरी काय ? त्याची सुरुवात कोणी केली हे जाणून घेऊया

आपल्या भारतीय संस्कृतीत जितक महत्त्व पितृपक्षाला आहे तितकेच ख्रिस्ती धर्मात हॅलोविनला. हॅलोविन हा ख्रिस्ती धर्मात पितरांचे स्मरण करण्यासाठी साजरा करणारा दिवस असतो. हल्ली या दिवसाबाबत आपल्याला सोशल मिडीया, ऑफिस पार्टी किंवा हॉलिवू़डच्या माध्यमातून पाहायला मिळतो. (Latest Marathi News)

लोकांच्या मनात या सणाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया काय आहे हॅलोविन सणाची (Festival) सुरुवात कधी झाली ? या दिवशी लोक भितीदायक कपडे का घालतात आणि भोपळ्याचा काय संबंध आहे.

हॅलोविनची सुरुवात कशी झाली?

ख्रिश्चन समुदायामध्ये 31 ऑक्टोबर हा सेल्टिक कॅलेंडरचा शेवटचा दिवस मानला जातो. जो हॅलोविन सण म्हणून साजरा (Celebrate) केला जातो. हॅलोविनची सुरुवात प्रथम आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये झाली. हॅलोविन डेबद्दल ख्रिश्चन समुदायातील लोकांमध्ये अशी धारणा आहे की, भूतांचा गेटअप ठेवल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपातील अनेक राज्यांमध्येही हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो.

हॅलोवीन आणि भोपळा कनेक्शन-

हॅलोविन सेलिब्रेशन मध्ये काळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने वापरला जातो. नारंगी रंग हा शक्तीचं प्रतिक आहे. तसेच युरोपात ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळा आणि उन्हाळा यादरम्यानचा काळ असल्याने निसर्गातही सारी वृक्ष, पानं पिवळी, नारंगी रंगाची झालेली असतात. तर काळा रंग भय, मृत्यू यांचं प्रतिक आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या सेलिब्रेशनमध्ये नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो. त्यासाठी भोपळा पोकळ करून त्यात भितीदायक चेहऱ्याचे चित्र रंगवून त्यात जळणारी मेणबत्ती ठेवली. ज्यामुळे भोपळे अंधारात भितीदायक दिसतात. या भोपळ्यांना स्वतःला हॅलोविन म्हणतात. बऱ्याच देशांमध्ये, अशा हॅलोविनला घराबाहेर अंधारात पूर्वजांचे प्रतीक मानल्या जाणार्‍या झाडांवर टांगले जाते. असे मानले जाते की हे भोपळे हॅलोविन सण संपल्यानंतर पुरले जातात.

हॅलोविनच्या दिवशी भितीदायक कपडे का घातले जातात?

हॅलोविन डे साजरा करण्यासाठी लोक भितीदायक कपडे आणि भितीदायक मास्क-मेकअप करतात. वास्तविक, यामागे शेतकर्‍यांचा असा विश्वास होता की, लागवडीच्या वेळी दुष्ट आत्मे पृथ्वीवर येऊन त्यांच्या पिकांचे नुकसान करू शकतात. यामुळेच हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी भितीदायक कपडे घालण्यास सुरुवात केली. तसेच याबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या कथा आणि समजुती आहेत.

हॅलोविनची विविध नावे -

हॅलोविन डेला ऑल हॅलोज इव्हनिंग, ऑल हॅलोवीन, ऑल हॅलोज इव्ह आणि ऑल सेंट्स इव्ह म्हणूनही ओळखले जाते. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन मिठाई भेट देतात आणि पोकळ भोपळ्यामध्ये डोळे, नाक आणि तोंड बनवतात आणि त्यामध्ये मेणबत्ती ठेवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT