Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

Mumbai Monorail Fails: पाच दिवसाच्या पावसानं 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल केलीय. मात्र इतका खर्च करुनही मोनोरेल फेल का ठरली? आणि त्यावर आता सरकारने काय कारवाई केलीय? पाहूयात.
Mumbai Monorail
Mumbai Monorailsaam tv
Published On
Summary
  • मुंबई मोनोरेल प्रकल्पावर ३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले.

  • फक्त ५ दिवसांच्या पावसानं मोनोरेलमधील त्रुटी उघड झाल्या.

  • तांत्रिक त्रुटी आणि नियोजनाच्या कमतरतेमुळे मोनोरेल अपयशी ठरली.

  • सरकारनं या प्रकल्पावरील चौकशीस सुरुवात केली असून जबाबदारांवर कारवाई होणार आहे.

हे आहे मुंबईतील मोनोरेलमधील प्रवाशांचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी तब्बल 3 हजार कोटी खर्च करुन सुरु केलेल्या मोनोरेलची पावसानं पोलखोल केलीय.

Mumbai Monorail
IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

पावसानं आधीच मुंबईकरांची दाणादाण उडवलेली. लोकल, रस्ते वाहतूक पाण्यामुळे कोलमडून गेलेली. त्यामुळेच प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडला. मात्र चेंबुरचा भक्ती पार्क ते म्हैसूर गार्डन दरम्यान खचाखच भरलेली मोनोरेल अचानक बंद पडली. मोनोरेलमधील एसीच नाही तर लाईटही बंद पडल्या आणि शेकडो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडून बंद असलेल्या मोनोरेलमध्ये प्रवासी अस्वस्थ झाले. दरम्यान श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने प्रवाशांनी मोनोची काच तोडून मोकळा श्वास घेतला. त्यानंतर प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलं.

Mumbai Monorail
Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

खरंतर 520 प्रवासी क्षमता असलेल्या मोनोरेलमधून 582 प्रवासी प्रवास करत होते. मात्र अतिवजनामुळे मोनोरेल अडकल्याचा दावा मोनोरेल प्रशासनाने केलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. मोनोरेलच्या बिघाडाची चौकशी केली जाईल. त्यातून सत्य बाहेर येईलही. मात्र मुंबईकरांना प्रवासासाठी अत्यंत गरज असतानाच या वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत आहेत. हजारो कोटी खर्च करुन तयार केलेली मोनोरेल 60 प्रवाशांचं जास्तीचं वजन पेलू शकली नाही. अवघ्या 5 दिवसांच्या पावसानं मुंबईच्या सर्वच व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com