Hair Loss Causes Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Loss Causes : या कारणांमुळे सुरु होते केसगळती, तुम्ही देखील ही चूक करत नाही ना?

Reason For Hair Loss : आजकाल केसगळतीच्या समस्यांमुळे त्रस्त आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर कारणांमुळे अनेकदा केसगळतीची समस्या सुरु होते. केसगळतीच्या समस्येमुळे तुमचे सौंदर्य देखील कमी होते.

कोमल दामुद्रे

Hair Loss Problem :

बदलत्या वातावरणाचा जितका आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तितकाच केसांवरही होतो. आजकाल केसगळतीच्या समस्यांमुळे त्रस्त आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर कारणांमुळे अनेकदा केसगळतीची समस्या सुरु होते.

केसगळतीच्या समस्येमुळे तुमचे सौंदर्य देखील कमी होते. जर तुम्ही देखील केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर या टिप्स फॉलो करा.

1. प्रथिनांची कमतरता

आजकाल लोकांच्या खाण्याच्या सवयी झपाट्याने बिघडतांना दिसून येत आहे. शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आरोग्यालाच हानी पोहोचत नाही तर केसांवरही त्याचा परिणाम होतो. बायोटिनच्या कमतरतेमुळे तुमचे केस (Hair) गळायला लागतात. तसेच व्हिटॅमिन सी न खाल्ल्याने आणि लोहाच्या कमतरतेमुळेही केस गळतात. केसगळती रोखण्यासाठी तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांचा (Doctor) सल्ला देखील घेऊ शकता.

2. तणाव

सतत चिंतेत राहिल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. तणावामुळे (Stress) टेलोजन इफ्लुव्हियम नावाची स्थिती उद्भवते ज्यामुळे केसगळतीची समस्या उद्भवते. जास्त ताणामुळे ही केसगळती वाढू शकते. त्यामुळे केस धुतल्याने किंवा विंचरल्यावर केस गळू लागतात.तणावावर मात करण्यासाठी तुम्हाला योगा किंवा नियमित व्यायाम करावा लागेल.

3. अनुवांशिक

काहीवेळा केस गळण्याची समस्या आनुवंशिकतेमुळे देखील होऊ शकते. याला एंड्रोजेनेटिक एलोपेशिया म्हणतात, ज्यामुळे बहुतेक लोकांमध्ये टक्कल पडू शकते.

4. वाईट सवयी

आजकाल लोक स्टाईल करण्यासाठी केसांवर अनेक प्रकारच्या गोष्टी वापरतात, ज्यामुळे केस खराब होऊ लागतात. त्यामुळे केस गळू लागतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT