Hair Falls Problem
Hair Falls Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Falls Problem : केसगळतीमुळे त्रस्त आहात ? 'हे' करुन पहा, 15 दिवसांत मिळेल रिजल्ट

कोमल दामुद्रे

Hair Falls Problem : शरीराचे सौंदर्य हे चेहऱ्यामुळे अधिक असे प्रत्येकाला वाटते परंतु, तितकेच महत्त्व हे केसांना देखील आहे. लांबसडक, काळेभोर व दाट केस कुणाला नाही आवडत. सगळ्याच आपले केस लांब असावे असे वाटते पण केसांमध्ये सतत कोंडा होणे, केसगळती यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत.

निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते, त्याचप्रमाणे निरोगी केसांनाही पोषण आवश्यक असते. मजबूत केसांसाठी प्रथिने, व्हिटॅमिन-ई, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन-बी असलेले अन्न सेवन करावे. चुकीच्या जीवनशैलीमुळे केस गळणे, कोंडा होणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. पण या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही केसांना निरोगी बनवू शकता. त्यासाठी मजबूत केसांसाठी रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा जाणून घेऊया.

मजबूत केसांसाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा

1. अंडी

अंड्यांमध्ये प्रथिने आणि बायोटिन भरपूर प्रमाणात असते, जे मजबूत केसांसाठी आवश्यक असते. निरोगी केसांसाठी आहारात अंड्यांचा अवश्य समावेश करा.

2. ओट्स

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात लोह, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि इतर जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे केस गळणे थांबते. जर तुम्ही आहारात नियमितपणे ओट्सचे सेवन केले तर ते तुमचे केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

3. गाजर

डोळ्यांसोबतच केसांसाठीही हे फायदेशीर आहे. गाजरमध्ये व्हिटॅमिन (Vitamins)-ए, व्हिटॅमिन-बी, लोह, झिंक आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे केस गळणे टाळता येते. गाजर केसांसाठी चांगले बूस्टर ठरू शकते.

4. आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-ई आढळते, जे केस वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. आवळ्याचा रस आहारात घेता येतो. केसांच्या (Hair) समस्या दूर होण्यास मदत होते.

5. मासे

फॅटी माशांमध्ये व्हिटॅमिन-डी, ओमेगा-3 आणि जीवनसत्त्वे असतात. जर तुम्ही केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही आहारात फॅटी फिश म्हणजेच सालमन, हिलसा इत्यादींचे सेवन करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

SCROLL FOR NEXT