कमी वयातच केस अकाली पिकू लागले की, ते पुन्हा काळे कसे करायचे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. केस पांढरे दिसू लागले म्हणजे आपण म्हातारे झालो असा संभ्रम अनेकांमध्ये दिसून येतो.
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण आणि केसांची नीट काळजी न घेतल्यामुळे केस पांढरे होतात. केस पांढरे होणे, सतत गळणे, कोंडा व इतर अनेक समस्यांवर उपाय करुनच पाहिले असतील. तसेच केसांसाठी आपण अनेक केमिकल्स उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे केसांचा पोत खराब होतो. त्याची वाढही खुंटते. त्यामुळे ते घनदाट होण्याऐवजी अधिक विरळ होऊ लागतात. परंतु, जर तुम्ही देखील या अकाली पिकणाऱ्या केसांमुळे त्रस्त असाल तर मेहंदीत स्वयंपाकघरातील हे पदार्थ मिसळून पाहा. रिजल्ट नक्की मिळेल.
1. मेहंदी आणि कांद्याची साल
4 चमचे मेंदी मेहंदी
१ कप कांद्याची साले
2 चमचे मेथी दाणे (Fenugreek Seeds)
2 चमचे कोरफड vera जेल
गरजेनुसार चहाचे पाणी किंवा कॉफी
2. कसा कराल वापर?
एका पॅनमध्ये मंद आचेवर कांद्याची (Onion) साल कोरडी भाजून घ्या. त्यानंतर सालाची पावडर तयार करुन घ्या.
यामध्ये मेथीदाणे बारीक करुन त्यात चहाचे पाणी किंवा कॉफी पेस्ट घाला.
नंतर मेहंदीमध्ये कांद्याची पावडर, मेथीदाणे पावडर, चहाचे पाणी आणि कोरफड जेल घालून रात्रभर झाकूण ठेवा. दुसऱ्या दिवशी हेअर मास्क केसांना लावा.
१ तास ठेवून केस कोमट पाण्याने धुवा.
3. मेहंदी आणि कांद्याची साल केसांना लावण्याचे फायदे
मेहंदी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. तसेच केसांना (Hair) पोषण देते. रासयनिक रंगासारखी ही हानिकारक नसते. यात वापरले जाणारे मेथी दाणे हे टाळूचे रक्त परिसंचण सुधारते. तसेच कोंडा, खाज सुटणे आणि जळजळीच्या समस्यांपासून सुटका होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.