Onion Hair Serum Saam tv
लाईफस्टाईल

Onion Hair Serum : केसांची वाढ होत नाहीये ? केसगळतीने त्रस्त आहात ? कांद्याचे सिरम ठरेल फायदेशीर

Hair Falls Problem : केस गळतीच्या समस्यांनी त्रस्त असाल आणि अनेक महागड्या कॉस्मेटिक प्रोडक्स वापरून थकला असाल तर

कोमल दामुद्रे

Benefits Of Onion : आपले केस लांब, घनदाट आणि काळेभोर असावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. आपले व्यक्तिमत्त्व उठावदार दिसण्यामागेचे सर्व श्रेय आपल्या केसांचे असते. काही जणांना चांगल्या केसांची देणगी जन्मतःच मिळालेली असते.

हल्लीची बदलती जीवनशैली (Lifestyle), वाढते प्रदुषण, धुळ आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वाढता वापर यामुळे केस गळणे, केसांची वाढ न होणे, केस पातळ होणे, कोंडा, अकाली पांढरे होणे अशा विविध समस्यांना सामारे जावे लागते आहे. जर का असेच केस गळत राहिले तर टक्कल पडण्याची भीती सतावू लागते.

जर तुम्ही देखील केस गळतीच्या समस्यांनी त्रस्त असाल आणि अनेक महागड्या कॉस्मेटिक प्रोडक्स वापरून थकला असाल तर केसगळतीसाठी कांदा हा बहुगुणी ठरेल. त्यासाठी हा घरगुती उपाय (Home remedies) नक्की ट्राय करुन पाहा.

1. केस गळतीवर कांदा कशा प्रकारे ठरतो उपायकारक?

कांदा आपण रोजच्या जेवणात अगदी न चुकता वापरतो, अर्थात कांदा नसेल तर जेवणाला चवच लागणार नाही. पण कांदा फक्त पदार्थाला चविष्ट बनवत नाही तर त्यात असलेली पोषकत्त्वे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. अनेक संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की कांद्याचा रस केसांना लावल्यास केसांची (Hair) मुळे घट्ट होऊन त्यांच्या वाढीस मदत करते. कांद्याचे तेल केसांच्या मुळांना पोषण पूरवते आणि गळण्यापासून रोखते. कांद्याचा रस केसांना लावल्यास केस तुटण्याच्या समस्येतून देखील सोडवते व केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

कांद्याच्या रसामध्ये झिंक, सल्फर, एन्जाइम कॅटालेस(अँटिऑक्सिडेंट), फॉलिक एसिड, व्हिटॅमिन 'सी', व्हिटॅमिन 'ई', व्हिटॅमिन 'बी', फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात जे बुर्शीजन्य संसर्गाशी लढण्यासाठी प्रभावी ठरते व केसांच्या वाढीस मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला देखील केस गळतीच्या समस्येवर कायमचा उपाय हवा असेल तर कांद्याच्या रसापासून सिरम तयार करून वापरू शकता.

2. कसा बनवावा कांद्याचा सिरम

कांद्याचा सिरम बनवण्यासाठी कांद्याचे तुकडे करून घ्यावेत आणि मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता एका वाटीत तयार पेस्ट गाळून घ्यावी व त्यात नारळाचे तेल घालावे. जर तुम्हाला कांद्याचा वास आवडत नसेल तर तुम्ही त्यात इसेंशियल ऑइलचे थोडे थेंब घालू शकता. अशा प्रकारे तुमचे कांद्याचे सिरम तयार आहे. तुम्ही हे सिरम काचेच्या बाटलीत स्टोअर करू शकता.

3. सिरमला योग्यप्रकारे वापरण्याची पद्धत पुढील प्रमाणेः

कांद्याचे सिरम तुम्ही साधारण दोन तासांपर्यंत केसांना लावून ठेवू शकता. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT