Hair Falls Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Falls Problem : शॅम्पूचा वापर केल्यानंतरही केस गळताय? हा आजार तर नाहीना, जाणून घ्या

केस गळती थांबवण्यासाठी काय कराल ?

कोमल दामुद्रे

Hair Falls Problem : केसांमुळे आपले सौंदर्य टिकून राहते त्याचबरोबर आपल्या आरोग्याविषयी असणाऱ्या अनेक तक्रारीदेखील समजून येतात.

आपण जेव्हा केस धुतो तेव्हा ते कोरडे, खडबडीत व निर्जलीकरण होतात. त्यामुळे ते अधिकच गळू लागतात व आपण घाबरतो. परंतु, ५०-१०० केस दिवसभरात गळत असतील तर ही बाब सामान्य आहे.

बरेच लोक केसांना शॅम्पू केल्यानंतर लगेच ते विचरायचा प्रयत्न करतात. त्यामुळे देखील केस गळू लागतात. सामान्य केस (Hair) गळणे व काही कारणांमुळे केस गळणे यातील फरक जाणून घेऊया.

केस व टाळू कोरडे पडणार नाही असा हलका व सल्फेट-मुक्त शैम्पू वापरणे आवश्यक आहे. केसांच्या लांबीवर हेअर कंडिशनर लावणे केसांच्या मुळाच्या छिद्रे उघडण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. याव्यतिरिक्त केसांचे स्वरुप समजते व इतर हानिकारक किरणांपासून वाचण्यास मदत होते.

केस गळतीपासून मुक्त होण्यासाठी नियमित केस धुणे नेहमीच चांगले असते. परंतु, शॅम्पू केसांना लावताना तो टाळूला चिकटणार नाही याची काळजी घ्या. शॅम्पू लावताना आपण त्याला तळहातावर घेऊन त्याचा फेस बनवा व हळूहळू केसांना लावा.

केस धुण्यासाठी नेहमी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा. चुकीच्या पध्दतीने केस धुतल्यास ते अधिक तुटू लागतात.

केस गळती थांबवण्यासाठी या हॅक्सचा वापर करा

१. योग्य आहाराचे पालन करा

२. ओल्या केसांवर कधीही कंगवा फिरवू नका

३. निम्न-स्तरीय लेसर लाइट थेरपी वापरून पहा

Hair Falls Problem

तसेच, हेअर स्प्रे, जेल, मूस आणि ड्राय शैम्पू यांसारख्या हेअर स्टाइलिंग उत्पादनांचा नियमित वापर केल्याने टाळूवर जळजळ होऊ शकते. तेलाचे थर, घाण, मृत त्वचेच्या (Skin) पेशी आणि उत्पादने तयार होण्यामुळे टाळूला जास्त धूळ आणि प्रदूषण आकर्षित होते. आपण केस धुतो तेव्हा आपली टाळू स्वच्छ करता त्यामुळे केसांची वाढ खुंटते किंवा केस गळू लागतात. त्यासाठी आपण केसांच्या व त्वचेनुसार आपण शॅम्पूचा वापर करायला हवा.

दिवसभरात ५० ते १०० केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. शॅम्पू केल्यानंतर आपले केस आधीच गळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ते अधिक सहजतेने गळतात. त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, ही केस गळती थांबवण्यासाठी आपल्याला टाळूची विशेष काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. (Hair Falls Problem In Marathi)

या गोष्टी लक्षात ठेवा -

१. केस धुताना सौम्य शॅम्पू वापरा आणि रोजच्या वापरासाठी अँटी-डँड्रफ शॅम्पूसारख्या शॅम्पू वापर करु नका.

२. आपल्या टाळूची स्थिती तपासून पहा जास्त कोंडा, सोरायसिस किंवा इतर कोणताही संसर्ग असेल तर आपल्याला औषधी शॅम्पूची आवश्यकता असू शकते. त्यामुळे तपासणीसाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.

३. उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात, आपले केस वारंवार धुण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घाम जमा होणार नाही.

४. कडिशनरचा वापर करताना तो टाळूला न लावता तो केसांच्या मुळाशी लावल्यास फायदेशीर होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT