Dandruff and hair fall in summer saam tv
लाईफस्टाईल

Hair fall in summer: उन्हाळ्याच्या दिवसात कोंड्यामुळे केसही गळतायत? तज्ज्ञांनी सांगितल्या समस्या टाळण्याच्या टिप्स, पाहा कशी घ्याल काळजी!

Dandruff and hair fall in summer: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक ठरतो. कोरडे आणि कमकुवत केस, टाळुला खाज सुटणे आणि टाळू कोरडा पडणे, घामाचा साचल्यामुळे डोक्यातील कोंडा होतो आणि बॅक्टेरियामुळे देखील केसांच्या मुळांना संसर्ग होतो (फॉलिक्युलायटिस) आणि केस गळतात.

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळ्याच्या दिवसात केसगळती वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी एक प्रमुख घटक म्हणजे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांशी येणारा संपर्क, ज्यामुळे केसांचे मुळ कमकुवत होऊ शकते आणि केस तुटू शकतात. उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे जास्त घाम येऊ शकतो, ज्यामुळे डोक्यात कोंडा होणे आणि फोड येण्यासारख्या समस्या उद्भवतात, परिणामी केस गळती वाढते.

मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या की, उन्हाळ्यात क्लोरीनयुक्त पाण्यात पोहल्याने किंवा खारट पाण्यात पोहल्याने केसांची मुळ कमकुवत होते तसेच त्यांचे नुकसान होते आणि त्यामुळे ते तुटण्याची अधिक शक्यता असते. उष्ण हवामानात ब्लो ड्रायर्स आणि स्ट्रेटनर्स सारख्या साधनांचा वापर केल्याने केस गळणे आणखी वाढू शकते.

उन्हाळ्यात केस गळती रोखण्यासाठी खास उपाय

टोपीचा वापर

जेव्हा उन्हाळ्यातील उष्णता असह्य होते तेव्हा आपल्या केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे महत्वाचे आहे. टोपी घालून किंवा डोके झाकण्यासाठी स्कार्फचा वापर करणे सूर्यप्रकाशात जाणे टाळणे गरजेचे आहे. हानिकारक अतिनील किरण केसांच्या मुळांना कमकुवत करतात, ज्यामुळे केस तुटणे आणि केस गळणे वाढू शकते.

हायड्रेशन

विचारात घेण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे हायड्रेशन. डिहायड्रेशनचा परिणाम केवळ तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच नाही तर केसांच्या आरोग्यावरही होतो. भरपूर पाणी प्या आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे जीवनसत्त्वे ए, सी आणि ई जीवनसत्वाने समृद्ध असलेले पदार्थांचा आहारात समावेश करा.

सौम्य उत्पादनं

तुमच्या केसांसाठी सौम्य उत्पादने निवडा आणि उन्हाळ्याच्या दिवसात केसांवर उष्णता निर्माण करणाऱ्या स्टाइलिंग उत्पादनांचा वापर टाळा. केसांच्या मुळांवरचा ताण कमी करणाऱ्या केशरचनांची निवड करा आणि केसांच्या मजबूतीसाठी तुमच्या दिनचर्येत नारळ किंवा आर्गन ऑईल सारख्या नैसर्गिक तेलांचा समावेश करा.

कंडिशनरचा वापर

केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर कंडिशनर लावा (शॅम्पूनंतर). केसांच्या हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशनमध्ये डीप-कंडिशनिंग हेअर मास्क देखील फायदेशीर ठरेल. स्विमींग पुलमधील क्लोरीन केस कोरडे आणि कमकुवत बनवते ज्यामुळे केस तुटतात. स्विमिंग कॅपच्या मदतीने आपले डोके झाकून आपल्या केसांची काळजी घ्या.

किती वेळा केस धुवाल?

दररोज आठवड्यातून तीनदा केस धुवावेत. जर टाळूवरील त्वचा तेलकट असेल आणि तुम्हाला तुमचे केस रोज धुवावेसे वाटत असतील तर ड्राय शॅम्पुचा वापर करा. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमचा टाळू आणि केस आतून हायड्रेट राहण्यास आणि केस गळणे टाळण्यास मदत होते.

आहार

फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश असलेला आहार हा तुमच्या केसांना निरोगी राहण्यासाठी मदत करतो आणि आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतो. त्यामुळे तुम्ही केसगळती रोखू शकाल आणि केस मजबूत होण्यास यामुळे मदत मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सेक्सटॉर्शन, डिजिटल अरेस्ट.. मुंबईकरांनी १५ महिन्यात गमावले ११२७ कोटी रूपये

Tax Saving Tips : करदात्यांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवण्याचे ५ मार्ग, ITR फाइल करण्याआधी नोट करा

HBD Sonu Nigam : लग्जरी गाड्यांचा शौकीन सोनू निगम कोट्यावधींचा मालक

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे पोलिस आयुक्तलयात जाणार

Sanjay Raut : 'ED धाडीचे धागेदोरे भुसेंपर्यंत जाऊ शकतात' संजय राऊत यांचा भुसेंवर हल्लाबोल | VIDEO

SCROLL FOR NEXT