Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केस कोरडे पडतात, डोक्यात सतत खाज लागते? हे घरगुती उपाय करुन पाहाच

Hair Falls Problem : केसात अतिरिक्त घाम जमा झाल्यामुळे केसांना ओलावा सुटतो. डोक्याला खाज देखील लागते.

कोमल दामुद्रे

Hair Itching Problem :

हिवाळा सुरु झाला की, केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. केसगळती, केसांची वाढ खुंटणे, केस कोरडे पडणे यांसारख्या अनेक समस्यांचा सामना प्रत्येक ऋतूमध्ये करावा लागतो. केसात धूळ साचणे, तणाव, उवा, कोंडा आणि बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.

केसात अतिरिक्त घाम जमा झाल्यामुळे केसांना ओलावा सुटतो. डोक्याला खाज देखील लागते. पण केसांची व्यवस्थितपणे काळजी घेतल्यास या त्रासातून आपली सुटका होऊ शकते. घामामुळे टाळूवर घाण साचते व छिद्रे तयार होतात ज्यामुळे केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. त्यामुळे केसात अधिक प्रमाणात कोंडा होतो. केसात सतत लागणाऱ्या खाजेमुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर हे घरगुती उपाय करुन पाहा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कांद्याचा रस

कांद्याचा रस केसात (Hair) येणाऱ्या खाजेपासून वाचवू शकतो. कांद्याच्या रसात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. अँटी-बॅक्टेरीयल गुणधर्म देखील आढळतात. ज्यामुळे टाळू स्वच्छ होऊन बॅक्टेरिया मुक्त राहाण्यास मदत होते. कांद्याचा रस केसात साचणारा कोंडा आणि टाळूला होणाऱ्या संसर्गजन्यांपासून दूर ठेवतो. केसांना कांद्याचा रस लावून मसाज करा. तासाभराने केस शाम्पूने धुवा.

2. कॅस्टर ऑइल

कॅस्टर ऑइलमध्ये अँटी- बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. याच्या वापराने केसांची मुळे मजबूत होतात. ज्यामुळे केसगळती कमी होते. जर तुमच्या केसात सतत खाज लागत असेल तर चमचाभर कॅस्टर ऑइल, मोहरीचे तेल आणि खोबऱ्याचे तेल (Oil) एकत्र करा. यानंतर हे तेल केसांच्या मुळांना लावून मसाज करा. रात्रभर तेल लावून ठेवा आणि सकाळी स्वच्छ पाण्याने केस धुवा. सतत येणाऱ्या खाजेपासून सुटका होईल.

3. दही

स्कॅल्पला होणाऱ्या इन्फेक्शन आणि खाज दूर करण्यासाठी दही (Curd) फायदेशीर मानले जाते. यात लॅक्टिक अॅसिड आढळते. तसेच प्रथिने देखील मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे केसांचा पोत सुधारतो. अर्धा कप दह्यात २ चमचे मोहरीचे तेल मिसळा. यामध्ये टी ट्री हेअर ऑइलचे काही थेंब टाका. नंतर केस शाम्पूने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT