Dhokla Recipe in Marathi: प्रत्येकालाच बाहेरचे पदार्थ खायला फार आवडतात. स्वादिष्ट आणि उत्कृष्ट चवीमुळे सर्वांनाच वेगवेळे पदार्थ ट्राय करायची इच्छा असते. प्रत्येक शहराची एक वेगळी खासियत असते. त्यामुळे कोणाला साऊथ इंडियन स्टाइल डोसा आवडतो तर कोणाला गुजराती स्टाइल खमन आवडतो. पण रोज बाहेरचे पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आज तुमच्यासाठी गुजराती स्टाइल खमनची रेसिपी आणली आहे. गुजराती खमनची रेसिपी स्त्रियांबरोबर स्वयंपाक घरातील नवीन आलेल्या मुलींना देखील खूप उपयुक्त ठरणार आहे. खमनची रेसिपी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्याघरी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.
बेसन पीठ
रवा
साखर
आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
लिंबूचा रस
पाणी
बेकिंग सोडा
तेल
मोहरी
हिंग
कढीपत्ता
हिरवी मिरची
कोथिंबीर
बारिक शेव
प्रथम एक बाउल घ्या, त्यात बेसन, रवा आणि साखर मिक्स करा. त्यानंतर त्यात आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आणि लिंबाचा रस अॅड करा. नंतर मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्या पीठाला चांगले एकजीव करुन घ्या. पुढे पीठाचे थोडे-जाड पातळ असे बॅटर तयार करा. चांगले बॅटर तयार झाल्यावर त्यात बेकिंग सोडा अॅड करा. त्यानंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करुन घ्या.
त्यानंतर गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी अॅड करा. खमनचे तयार केलेले बॅटर एका ताटात टाकून घ्या. या बॅटरला कढईवर वाफवण्यासाठी १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर मध्ये-मध्ये त्या बॅटरला चेक करत रहा. पूर्णपणे शिजल्यावर गॅस ऑफ करा आणि खमनला थोड्या वेळासाठी थंड होऊ द्या.
त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये फोडणीसाठी तयारी सुरु करा. प्रथम गॅस ऑन करुन त्यावर नॅान स्टीक पॅन ठेवा. त्यानंतर त्यात तेल टाकून ते गरम होऊ द्या. पुढे तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या अॅड करा. या सर्व फोडणीच्या मिश्रणाला एकत्रीत तडूतडू द्या. त्यानंतर त्यात थोडसे पाणी आणि साखर टाकून मिक्स करुन घ्या. पूर्णपणे मिक्स झाल्यावर फोडणीचे सर्व मिश्रण आपल्या वाफवलेल्या बॅटरवर टाकून घ्या.
नंतर फोडणीचे मिश्रण हलक्या हाताने पसरवून घ्या. यानंतर त्यावर सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथींबिर आणि बारीक शेव अॅड करा. तसेच सुरीच्या साहिय्याने खमनचे तुकडे करा. अशा पद्धतीने आपली खमनची रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही खमनला हिरव्या किंवा गोड चटणीसोबत सर्व्ह करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.