WHO Food Guidelines Google
लाईफस्टाईल

WHO Food Guidelines: डाएटबाबत WHO ने जारी केल्या गाइडलाईन्स; चांगल्या आरोग्यासाठी काय आणि किती प्रमाणात खाल्लं पाहिजे?

WHO Food Guidelines: जागतिक आरोग्य संघटनेच तुमचं योग्य डाएट कसं असलं पाहिजे, याबाबत माहिती दिली आहे. निरोगी राहण्यासाठी आपला आहार कसा असला पाहिजे, याची माहिती दिलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपला फीटनेस जपण्यासाठी आपण आहारावर भर देतो. यासाठी आपण विविध प्रकारचे डाएट फॉलो करतो. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेनेच तुमचं योग्य डाएट कसं असलं पाहिजे, याबाबत माहिती दिली आहे. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या मते, सकस आहारामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. त्याचप्रमाणे चांगला आहार पाळल्याने असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो.

WHO यानुसार, सकस आहार घेतल्यास शरीरात कोणत्याही प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. यासाठी डब्ल्यूएचओने फूड गाईडलाईन्स जारी केली आहेत. यामध्ये निरोगी राहण्यासाठी आपला आहार कसा असला पाहिजे, याची माहिती दिलेली आहे.

WHO नुसार, हा आहे हेल्दी डाएट चार्ट

  • डब्ल्यूएचओने अन्न मार्गदर्शक तत्त्वं जारी केली असून प्रौढ व्यक्तीच्या आहारात फळं, भाज्या, कडधान्य यांचा समावेश असला पाहिजे.

  • त्याचप्रमाणे आहारात रोज भाज्या खाव्यात. कच्च्या भाज्या आणि स्नॅक्स खाणं फायदेशीर ठरेल. त्याप्रमाणे हंगामी फळं आणि भाज्या यांचाही समावेश केला पाहिजे.

  • साखरेचं सेवन कमी करणं गरजेचं असून जास्त साखरेमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यासोबतच लठ्ठपणाही वाढू लागतो. त्यामुळे कार्बोनेटेड ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स, रेडी टू ड्रिंक टी यांचं सेवन कमी करावं.

  • ज्या वस्तू वाफवून खाल्ल्या जाऊ शकतात, त्यांना तळून खाण्याची गरज नाही.

  • लोणी आणि तुपाच्या ऐवजी पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स असलेलं तेल वापरावं

  • दिवसभरात एक चमचा मीठ घेणं योग्य असून ते फक्त आयोडीनयुक्त मीठ असावं.

  • अन्नामध्ये ट्रान्स फॅट्सच सेवन टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मांस, भाजलेले आणि तळलेले पदार्थ, फ्रोझन पिझ्झा, कुकीज, बिस्किटं हे पदार्थ कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.

  • बेकरी प्रोडक्स्टचा आहारात समावेश करू नये. केक किंवा डोनट्स यांचं सेवन टाळावं.

आहारातील धान्यांचं प्रमाण मर्यादित असलं पाहिजे

मुळात तुमच्या आहारामध्ये प्रत्येक पदार्थाचं एक प्रमाण असणं गरजेचं आहे. यामध्ये एक भाग धान्य आणि बाजरी यांचा आहे. यानंतर डाळी, मांस, अंडी, सुका मेवा आणि दूध किंवा दही येतात. एका प्लेटमध्ये 45 टक्के धान्य असलं पाहिजे तर तर कडधान्ये, अंडी आणि मांसाहाराची टक्केवारी सुमारे 14 ते 15% असली पाहिजे. जर तुम्ही या प्रमाणात आहार घेतला तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे.

आपल्या रोजच्या आहारातील साखर, मीठ आणि चरबी कमी करण्यासाठी आपण अधिकाधिक फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्या पाहिजेत. गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना शक्य तितकं दूध, अंडी आणि मांस खाण्याचा सल्ला देखील जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT