Gudi Padwa Special Kadulimb-Gul Importance in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Gudi Padwa 2024 Special: गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब- गुळ का खाल्ले जाते? जाणून घ्या कारण

कोमल दामुद्रे

Why Do You Eat Neem And Jaggery On Gudi Padwa :

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण गुढीपाडवा. हिंदू नववर्षातला पहिला सण. हा सण म्हणजे मांगल्याचा, चैतन्याचा दिवस. या दिवसापासून अनेक शुभ कार्य केले जाते. यंदा गुढीपाडव्याचा सण हा ९ एप्रिलला साजरा केला जाणार आहे.

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण हा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो.

गुढीपाडव्याला संवत्सर पाडो म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेकांच्या दारात गुढी उभारली जाते. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. तसेच गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

गुढीपाडव्याला प्रत्येक राज्यात विविध नावांनी ओळखले जाते. कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये गुढीपाडव्याला युगादी किंवा उगादी असे म्हणतात. पाडवा या शब्दाचा संस्कृत मराठी अपभ्रंश पडव, पाडवो. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्रशुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून याला चैत्रपाडवा असे देखील म्हटले जाते.

महाराष्ट्रात या दिवशी श्रीखंड आणि पुरीची चव चाखली जाते. तर भारताच्या दक्षिणेकडील प्रातांमध्ये या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाल्ले जाते. पण हे का खाल्ले जाते. याचे कारण काय? जाणून घेऊया

1. कडुलिंब आणि गुळ का खातात?

गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र महिना सुरु होतो. या काळात पानांना पालवी फुटते. आसमंत बहरतो. ऋतू बदल्यामुळे अनेक आजार (Disease) बळवतात. गुळ (jaggery) आणि कडुलिंब हे सुख-दु:खाचे कारण मानले जाते. आयुर्वेदानुसार याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका टाळता येतो. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने अनेक मौसमी आजारांपासून वाचवण्यास मदत करते. चेहऱ्यावरील मुरुम आणि खाज यापासून आराम मिळतो. गूळ खाल्ल्याने अॅसिडीटीची शक्यता कमी होते. गुळातील खनिजे, कर्बोदके आणि पोषक घटक हवामानातील बदलामुळे श्वसनाच्या समस्यांशी लढण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गोलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

SCROLL FOR NEXT