GTA Trilogy On Netflix Saam Tv
लाईफस्टाईल

Netflix युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता मोबाईलवर खेळता येईल लोकप्रिय गेम GTA, कसं? ते आणून घ्या

Satish Kengar

GTA Trilogy on Netflix: 

जीटीए हे नाव ऐकताच मनात एक पात्र घुमू लागतं, जो रस्त्यावर इकडे तिकडे फिरतो. तुम्ही त्या पात्राला अशा गोष्टी करायला लावू शकता, जे तुम्ही कदाचित वास्तविक जगात करू शकत नाही. तुम्हालाही ते दिवस आठवत असतीलच. या गेमच्या प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

नेटफ्लिक्स आपल्या ग्राहकांना त्यांच्या फोनवर GTA Trilogy: The Definitive Edition फ्रीमध्ये खेळण्यासाठी ऑफर करत आहे. GTA Trilogy गेम GTA Vice City, GTA San Andreas आणि GTA III या तीन सर्वात लोकप्रिय गेमवर आधारित आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, ट्रायलॉजी पॅकमध्ये समाविष्ट असलेल्या गेममध्ये प्रवेश करण्यासाठी, तुम्हाला आधी नेटफ्लिक्स अॅपद्वारे प्री-रजिस्टर करावं लागेल. सर्व गेम फोनसाठी अपडेट केले जातील आणि ते नेटफ्लिक्स मोबाइल अॅप, अॅप स्टोअर किंवा Google Play Store द्वारे अॅक्सेस केले जाऊ शकतात. (Latest Marathi News)

जीटीए ट्रिलॉजी गेम कधी रिलीज झालं?

जीटीए ट्रिलॉजी गेम्स हे व्हाइस सिटी, सॅन अँड्रियास आणि जीटीए III च्या रीमास्टर केलेले व्हर्जन आहेत. कंपनीने पहिल्यांदा GTA व्हाइस सिटी आणि GTA III अनुक्रमे 2002 आणि 2001 मध्ये रिलीज केले. तर GTA San Andreas 2004 मध्ये कंपनीने जारी केले होते. The Grand Theft Auto: The Trilogy – The Definitive Edition, ज्यामध्ये तिन्ही गेमच्या रीमास्टर केलेलं व्हर्जन आहेत, ते 2021 मध्ये रिलीझ करण्यात आले होते.

दरम्यान, रॉकस्टार गेम्सने GTA VI चा ट्रेलर डिसेंबरमध्ये येणार असल्याची घोषणा केली होती. काही रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, चाहते 12 डिसेंबरपासून GTA VI ची प्री-ऑर्डर करू शकतील. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Scrub: चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हा' स्क्रब करा ट्राय...

Marathi News Live Updates : पंढरपूरजवळ धावत्या शिवशाही बसला आग, प्रवाशांची धावपळ

Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT