Relationship Tips
Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : नात्यामध्ये वाढतोय दुरावा? पार्टनला वेळ देता येत नाही?तर, 'या' 5 ट्रिक्स वापरून पहा

कोमल दामुद्रे

Relationship Tips : रोजच्या या धावपळीच्या जीवनात अनेक नात्यांमध्ये दुरावे निर्माण झाले आहे. वेळेचा अभाव आणि कमी प्रमाणात बोलणे होणे. या सगळ्याचा प्रभाव नात्यांमध्ये पडतो.

नात्यांमध्ये येणाऱ्या या अडथळ्यामुळे अनेक लोकांचे नाते लवकरात लवकर तुटते. वेगवेगळ्या प्राथमिक गरजांमुळे लोक एकमेकांना स्वतःचा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळेच अनेक नात्यांमध्ये दरी निर्माण होते.

कोणत्याही नात्यांमध्ये (Relation) आपलेपणाची जाणीव होणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु कामकाजामुळे लोक एकमेकांना टाईम (Time) देऊ शकत नाही. परंतु असं सतत होत असल्याने तुमचे नाते हळूहळू संपून जाऊ शकते.

तुम्हाला तुमचं नातं अधिक घट्ट करायचं असेल आणि एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करायचा असेल तर आम्ही सांगितलेल्या टिप्स (Tips) फॉलो करा. याचं कारण नेमकं काय आहे. हे आपण जाणून घेऊ.

1. एकमेकांसोबत संवाद साधा :

उत्तम संवाद हा कोणत्याही नात्यांमधील दुरावा नष्ट करण्यासाठी उपयोगी पडतो. जेव्हा आपल्याला हे समजते की आपल्याला देखील कोणीतरी समजून घेत आहे. तेव्हा त्या नात्यांमध्ये सुरक्षा आणि भावना निर्माण होते. म्हणूनच जेव्हा तुमच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दूरावे निर्माण झाले असतील. तर तुमच्या भावनांना दाबून टाकण्यापेक्षा किंवा रागामध्ये बाहेर निघून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एका जागेवर बसून मनापासून आणि सन्मानपूर्वक संवाद साधा. अशावेळी तुमच्या पार्टनरला असं वाटेल की या व्यक्तीचा माझ्यावरती भरपूर विश्वास आहे आणि तो गोष्टी सुधारण्यासाठी तुमची साथ देईल.

2. एकत्र कॉलिटी टाईम घालवा :

जीवनामध्ये व्यक्ती अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असतो. खासकरून लहान मुलांमुळे आणि जास्त कामाचा त्रास असल्यावर व्यक्ती पूर्ण दिवसभर व्यस्त असतो. परंतु तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी तुमच्या पार्टनरसाठी थोडा वेळ तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही डेट नाईट वरती जाऊ शकता. किंवा घरामध्ये एकमेकांसोबत टाईम घालवू शकता. एकमेकांसोबत कॉलिटी टाईम घालवल्याने तुमचे नाते मजबूत होईल. त्याचबरोबर तुमच्यामध्ये अंतरंगताची भावना जागी राहण्यास मदत होईल.

Couple

3. एकमेकांच्या स्वप्नांचे समर्थन करा :

तुमच्या पार्टनरला त्याची जाणीव करून द्या की तुमच्या आयुष्यात त्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरची प्रशंसा करणे आणि एकमेकांच्या स्वप्नांमध्ये एकमेकांची साथ देणे त्याचबरोबर सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. रोजच्या मुद्द्यांमधील काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुमचं मन या गोष्टींमध्ये गुंतवा. ज्यामधे तुम्ही दोघं सुद्धा खुश राहाल. असं केल्याने तुमच्यामध्ये जवळीक निर्माण होईल आणि तुमचे संबंध अधिक मजबूत बनतील. त्याचबरोबर तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये आनंद देखील प्राप्त होईल.

4. पर्सनल स्पेसचा सन्मान करा :

कोणत्याही चांगल्या नात्यांमध्ये एक लिमिट असणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही नात्यांमध्ये पर्सनल स्पेस असणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. अशातच तुम्हाला तुमचा नातं मजबूत बनवायचं असेल तर, एकमेकांनी एकमेकांच्या पर्सनल स्पेसमध्ये डोकावू नये. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची शंका येत असेल तर तुम्ही सरळ तुमच्या पार्टनरसोबत संवाद साधावा.

5. रोमान्स करण्यासाठी वेळ काढा :

एका कपल्सच्या (Couple) दृष्टीने एकमेकांचं नातं मजबूत बनवण्यासाठी रोमान्स करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर अंतरंगता देखील गरजेची आहे. अंतरंगाचा फक्त शारीरिक नसून, भावनात्मक सुद्धा असते. म्हणूनच जेव्हा तुम्ही सोबत असाल तेव्हा एकमेकांना जवळ घेण्यासाठी, प्रेम करण्यासाठी वेळ नक्की काढा. या छोट्या छोट्या गोष्टी सतत केल्याने तुमच्या पार्टनरला असं वाटेल की याचे माझ्यावर आधीसारखीच प्रेम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

Rakhi Sawant Successful Surgery : राखी सावंतवर कशी झाली सर्जरी ?, Ex Husband ने दिली हेल्थ अपडेट; खिल्ली उडवणाऱ्यांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT