Green Peas Peel Benefits  saam Tv
लाईफस्टाईल

Green Peas Peel Benefits : वाटाण्याच्या सालींपासून बनवा चविष्ट भाजी, जाणून घ्या रेसिपी

थंडीच्या दिवसांत विविध प्रकारच्या शरीरासाठी पौष्टिक असणाऱ्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात.

कोमल दामुद्रे

Green Peas Peel Benefits : थंडीचे दिवस सगळ्यांनाचं फार आवडतात. थंडीच्या दिवसांत आपण विविध प्रकारचे पदार्थ खातो. त्याचबरोबर थंडीच्या दिवसांत विविध प्रकारच्या शरीरासाठी पौष्टिक असणाऱ्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात.

थंडीच्या दिवसात वाटाणे जास्त प्रमाणात बाजारामध्ये पाहायला मिळतात. वाटाण्याची भाजी, वाटाण्याचा भात आपण सगळेच खातो. पण वाटाण्याच्या सालीची भाजी तुम्ही खाल्ली आहे का ? नसेल तर जाणून घ्या रेसिपी.

थंडीच्या दिवसांत वाटाण्याची भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. वाटाण्यांपासून तुम्ही फक्त भाजीच नाही तर पराठे, सँडविच, समोसे आणि कचोरी सुद्धा बनवतात. थंडीच्या दिवसात हे सगळे पदार्थ बनवून खाण्याची मज्जा काही औरच असते.

बरेच लोक वाटाण्याची भाजी बनवताना वाटाणे घेतात पण वाटाण्याची साल फेकून देतात. लोकांचा आता समज आहे की, वाटाण्याच्या भाजीची साल निरुपयोगी आहे. परंतु असा विचार करण अत्यंत चुकीचं आहे. आज आम्ही तुम्हाला वाटाण्याच्या सालीची भाजी बनवायला शिकवणार आहोत. एवढी चविष्ट भाजी खाऊन घरातील सगळे लोक स्वतःची बोटं चाटत राहतील. त्याचबरोबर ही भाजी चवीला अतिशय स्वादिष्ट असते. वाटाण्याच्या सालीची भाजी बनवणे अतिशय सोपे आहे. जाणून घेऊया ती कशी बनवायची

1. साहित्य

  • हिरव्या वाटाण्याच्या साली ( 30 ते 35 )

  • कापलेले बटाटे

  • दोन मोठे चमचे तेल

  • बारीक कापलेला कांदा

  • अर्धा चमचा जिरे

  • चवीनुसार मीठ

  • टोमॅटोची पेस्ट

  • अर्धा चमचा गरम मसाला पूड

  • अर्धा चमचा लाल तिखट

  • अर्धा चमचा धने पूड

  • एक छोटा चमचा हळद (Turmeric)

  • अद्रक लसूण ची पेस्ट

Green Peas Peel Benefits

2. भाजी बनवण्याची विधी :

  1. हिरव्या वाटाण्याच्या सालीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटाण्याच्या साली सोलून एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने (Water) धुऊन घ्या.

  2. त्यानंतर बटाट्याचे लांब लांब काप करून ते सुद्धा धुवून घ्या.

  3. आता एका नॉनस्टिक कढईमध्ये तेल (Oil) गरम करायला ठेवा.

  4. तेल चांगलं गरम झाल्यावर कढईमध्ये जिरे आणि कांदा टाकून चांगलं परतून घ्या.

  5. त्यानंतर त्यामध्ये बटाटे, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून चांगलं परतून घ्या.

  6. त्यानंतर अद्रक आणि लसूण ची पेस्ट टाकून चांगलं शिजवून घ्या.

  7. जोपर्यंत बटाटा शिजत नाही तोपर्यंत कढईवर झाकण ठेवा.

  8. त्यानंतर बटाटा शिजून झाल्यावर टोमॅटोची पेस्ट टाकून तीन मिनिटे शिजवा.

  9. त्यानंतर वाटाण्यांच्या सालींचे तुकडे करून कढई मध्ये टाका.

  10. त्यानंतर काही मिनिटांनी सगळे मसाले टाकून चांगलं परतून घ्या.

  11. तयार आहे तुमची चविष्ट वाटण्याच्या सालीची भाजी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

प्रवाशांसाठी मोठी बातमी! १० लोकल स्टेशन्सचं होणार कायापालट, लवकरच रेल्वेच्या नियंत्रणात जाणार

Diwali 2025 : जेवणाचा मेन्यू ठरला! फक्त ३० मिनिटांत बनेल स्पेशल थाळी, एकदा ट्राय तर करा 'या' सिंपल रेसिपी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

वकिलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT