MSCC Saving Scheme - Mahila Sanman Saving Certificate Information Know in Marathi Mahila Sanman Saving Certificate Information Know in Marathi - Saam Tv
लाईफस्टाईल

MSCC Saving Scheme: सरकारची महिलांसाठी खास योजना; हजार रुपयांची गुंतवणूक करुन मिळवा अधिकचा परतवा

Mahila Sanman Saving Certificate Information Know in Marathi: सरकारने महिलांसाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना राबवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mahila Sanman Saving Certificate:

सरकार नेहमीच नागरीकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. वयोवृद्ध लोकांपासून ते महिलांसाठी उपयोगी योजना राबवण्यात येतात. सरकारने महिलांसाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना राबवली आहे. महिलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना खूप फायदेशीर आहे. यात महिला काही काळासाठी गुंतवणूक करुन बचत करु शकतात. या योजनेत सर्व वयोगटातील महिला गुंतवणूक करु शकतात. जाणून घेऊया या योजनेबद्दल

महिला सन्मान बचत योजना

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेअंतर्गत कोणतीही महिला 1 हजारांपासून ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही 2023 मध्ये खाते उघडल्यास दोन वर्षात म्हणजे 2025 मध्ये या खात्याची मॅच्युरिटी होईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.50 टक्के व्याजदर मिळेल.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत तुम्ही 1 हजारांपासून ते 2 लाखांपर्यंत पैसे गुंतवू शकतात. जर एखाद्या मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर ती तिच्या पालकांच्या मदतीने पोस्ट ऑफिस खाते उघडू शकते. या खात्यात तुम्ही गुंतवणूक केल्यात आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सुट मिळेल.

योजनेत खात कसं उघडायचं?

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा या बँकामध्ये खाते उघडू शकता. हे खाते उघडण्यासाठी फॉर्म 1 भरावा लागेल. या योजनेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे आणि पासपोर्ट फोटो आवश्यक आहे.

मुदतीआधी पैसे काढू शकणार

खातेधारकांना गरज असल्यास एका वर्षानंतर महिला बचत योजनेच्या खात्यातून ४० टक्के रक्कम काढता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT