Google Pixel 8 Series Saam Tv
लाईफस्टाईल

Google Pixel 8 Series: गुगलची मोठी घोषणा, या दिवशी लॉन्च होणार Pixel 8 सीरीज, iPhone 15 ला देणार टक्कर?

Pixel 8 Series News: गुगलची मोठी घोषणा, या दिवशी लॉन्च होणार Pixel 8 सीरीज, iPhone 15 ला देणार टक्कर?

Satish Kengar

Google Pixel 8 Series News:

Apple नंतर आता Google ने देखील त्यांच्या फ्लॅगशिप Pixel 8 सीरीजची लॉन्च डेट जाहीर केली आहे आहे. Pixel 8 सीरीज 4 ऑक्टोबर रोजी लॉन्च होईल. अशातच Apple ने देखील आपला बहुचर्चित iPhone 15 लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. अॅपल 12 सप्टेंबर रोजी आपला हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Pixel 8 चा लॉन्च इव्हेंट अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे होणार आहे. यावेळी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई देखील उपस्थित राहणार आहेत. मागच्या वेळेप्रमाणेच या वेळीही गुगलने आपल्या पिक्सेल स्मार्टफोन्सचे डिझाईन लॉन्च होण्यापूर्वीच उघड केले आहे. कंपनीने नुकताच फोल्डेबल स्मार्टफोन देखील लॉन्च केला आहे, जो भारतात उपलब्ध नाही.

Pixel स्मार्टवॉच देखील Pixel 8 सह लॉन्च केली जाऊ शकते. याशिवाय कंपनी Pixel Buds A सीरीज आणि Pixel Buds Pro चे नवीन व्हर्जन देखील लॉन्च करू शकते. Pixel 8 लॉन्च झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर iPhone 15 बाजारात येणार आहे. यामुळेच Pixel 8 iPhone ला टक्कर देऊ शकतो, असं बोललं जात आहे.

असं असलं तरी या इव्हेंटमध्ये गुगलचे आणखी हार्डवेअर लॉन्च केले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Google त्याच्या हार्डवेअर इव्हेंटमध्ये इतर अनेक उत्पादने देखील लॉन्च करते, ज्यामध्ये Fitbit आणि Nest मधील डिव्हाइसेसचा देखील समावेश असतो. (Latest Marathi News)

Pixel 8 सीरीजमध्ये काय असेल नवीन?

Pixel 8 सीरीजची डिझाइन Pixel 7 सीरीजसारखी असेल. हार्डवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, यावेळी कंपनीला टेन्सर चिपसेटची नवीन व्हर्जन दिले जाऊ शकते आणि कॅमेरा सिस्टम देखील नवीन असेल. मात्र याच्या बेस मॉडेलमध्ये जुने कॅमेरा लेन्स दिले जाण्याची शक्यात आहे. परंतु कंपनी प्रो मॉडेलमध्ये नवीन कॅमेरा सेन्सरसह येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्डकप 2026 साठी पात्र ठरलेल्या टीम्स कोणत्या? पाहा 20 टीम्सची संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Maharashtra Rain Alert : दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! कोकण-मराठवाडा अन् विदर्भाला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

दिवाळीसाठी शॉपिंग करून घराकडे येताना भयंकर अपघात, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याने सोडले प्राण

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT