Unblock Yourself In WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपची नवी सेटिंग! स्वतःला अनब्लॉक करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

WhatsApp Settings : आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाचे साधन झाले आहेत. या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्र, कुटुंब किंवा जोडीदाराशी सहज बोलू शकता.
Unblock Yourself In WhatsApp
Unblock Yourself In WhatsAppSaam Tv
Published On

Unblock Yourself : आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाचे साधन झाले आहेत. या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्र, कुटुंब किंवा जोडीदाराशी सहज बोलू शकता. यावरून तुम्ही बऱ्याच पध्दतीने संवाद साधू शकता. जोडीदार किंवा मित्राशी बोलण्याचा WhatsApp हा एक उत्तम मार्ग आहे.

पण, बऱ्याचदा असे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही एकमेकांवर इतके नाराज होतात किंवा काही गैरसमजामुळे तुमच्यापैकी एक जण ब्लॉक करतो. अनेकवेळा ज्या व्यक्तीला तुमचा राग आला आहे ती व्यक्ती तुम्हाला रागाच्या भरात व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) ब्लॉक करतो. जेणेकरून तो मेसेज किंवा कॉल करू शकत नाही.

Unblock Yourself In WhatsApp
WhatsApp New Features : यापुढे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्टिकर नाही तर हे हटके फिचर वापरुन करता येणार रिप्लाय, वाचुन खुश व्हाल

पण, जेव्हा हे असे घडते तेव्हा अनेकदा एकच प्रश्न मनात येतो की आपण ब्लॉक झालो असलो तर तो ब्लॉक कसा काढावा त्या व्यक्तीचा राग घालवण्यासाठी तुम्ही हे मार्ग ट्राय करू शकता. ब्लॉक केल्यानंतरही तुम्ही समोरच्या व्यक्तीशी कसे बोलू शकता हे पाहूयात. ब्लॉक झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या जोडीदाराशी, मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी WhatsApp वर कसे चॅट करू शकता हे या स्टेप्स फॉलो करा आणि अनब्लॉक व्हा.

तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही ते प्रथम तपासा

व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतःला अनब्लॉक करण्यासाठी, आधी समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही ते तपासा. मेसेज (Massage) पाठवा, मेसेज गेला नाही आणि एकच टिक राहिली तर समजा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या समोर असलेल्या व्यक्तीच्या ब्लॉक लिस्टमधून स्वतःला काढून टाकण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-

Unblock Yourself In WhatsApp
Aadhaar Card Update : सावधान ! UIDAI ने केले अलर्ट, तुम्हीही WhatsApp आणि Gmail वरून आधार कार्ड शेअर करता? वाचा सविस्तर
  • सर्वात आधी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि सेटिंगमध्ये जा.

  • आता Account Settings वर जा. यासाठी तुम्हाला अकाउंट (Account) ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

  • तुम्ही अकाऊंट सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला डिलीट माय अकाउंटचा पर्याय दिसेल. या लिंकवर क्लिक करा.

  • आता या पेजवर दिसणार्‍या देश कोड पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. आता Delete My Account वर जा आणि खाते डिलीट करा.

  • तुमचे खाते हटवल्यानंतर, पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपवर जा आणि नवीन खाते तयार करा.

  • तुम्ही नवीन खाते तयार करताच, ज्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल त्या व्यक्तीशी तुम्ही पुन्हा बोलू शकता.

दुसरा मार्ग

यासाठी तुम्ही तुमच्या मित्राची मदत घेऊ शकता. त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यास सांगा. आता स्वतःला आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्या व्यक्तीला या ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यास सांगा. आता तुम्ही पाठवलेले मेसेज तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीलाही उपलब्ध होतील. या ट्रिकद्वारे तुम्ही अगदी हट्टी व्यक्तीलाही पटवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com