Honda Hornet 2.0 Colours :प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Honda Motorcycle India नुकतीच भारतात लॉन्च केली आहे. या बाईकचे नाव Honda Hornet 2.0 आहे. इंजिन आणि फिचर्ससह बाजारात उपलब्ध झाली आहे.
Honda Hornet 2.0 बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. या बाईकची किंमत १.३९ लाख रुपये आहे. बाईकमध्ये BS6 OBD2 कॉम्प्लायंट इंजिन आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. भारतात या बाईकची स्पर्धा TVS Apache RTR 180 शी करेल. होंडाच्या या बाईकची १० वर्षाची वॉरंटी आहे. यात तीन वर्ष स्टँडर्ड तर ७ वर्ष एक्स्ट्रा वॉरंटी असेल.
डिझाइन आणि रंग
Honda Hornet 2.0च्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. मागील बाईकच्या तुलनेत काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. बाईकला एलईडी हेडलाईट्स, शार्प बॉडी पॅनेल देण्यात आले आहे. या बाईकच्या इंधनाच्या टाकीवर नवीन ग्राफिक्सही दिले आहेत. त्यामुळे बाईकला अजून चांगला लूक आला आहे. बाईकमध्ये रंगामध्येही ४ पर्याय देण्यात आले आहे.
इंजिन स्पेसिफ्केशन
या बाईकला 184.4cc सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8500rpm वर 17bhp जास्तीत जास्त पॉवर आणि 6000rpm आणि 15.9nm टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन BS6 फेज-२ नुसार तायर केले आहे. विशेष म्हणजे, ही बाईक E-20 पेट्रोलवरही चालेल. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स आणि नवीन असिस्ट आणि स्लिपर क्लचसह ट्यून केलेले आहे.
वैशिष्ट्ये
बाईकला एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे. यामध्ये हेडलॅम्प, टेललॅम्प आणि इंडिकेटरचा समावेश आहे. यामध्ये नवीन हॉर्नेटला 5-लेव्हल लाइटिंग कंट्रोलसह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स क्लस्टर देण्यात आला आहे. ज्यामुळे आपल्याला गीअर स्टेटस इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, ट्रिप कॉम्प्युटर, स्पीड यासारखी विविध माहिती दाखवते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.