GPay Payment Saam Tv
लाईफस्टाईल

Delete Gpay Transaction: पार्टनरपासून पेमेंट डिटेल्स लपवायचे आहेत? Gpay ट्राजेंक्शन असं डिलीट करा

How to Delete Gpay Transaction Know The Method in Marathi: लोकांकडून गुगल पे या अॅपचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या अॅपवरून तुमच्या आयडीवरून किती जणांना किती रुपये पाठवले जातात, याबाबतची माहिती सहज उपलब्ध असते.

Vishal Gangurde

How to Delete GPay Transaction History:

सध्या लोकांकडून ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. लोकांकडून गुगल पे या अॅपचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या अॅपवरून तुमच्या आयडीवरून किती जणांना किती रुपये पाठवले जातात, याबाबतची माहिती सहज उपलब्ध असते. या ट्राजेंक्शनची माहिती सहज डिलीट देखील करू शकता.

तुम्ही ट्राजेंक्शन कुठे पाहाल?

टाजेंक्शनची माहिती डिलीट करायची असेल तर काही पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला गुगल पे अॅप सुरु करावं लागेल. अॅप सुरु केल्यानंतर होम पेज स्क्रोल करा. या पेजवर ४ पर्याय दिसतील. यात तिसरा पर्याय 'सी ट्राजेंक्शन हिस्ट्री' हा पाहायला मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर पूर्ण डिटेल्स पाहायला मिळतील.

पेमेंट डिटेल्स कसे डिलीट कराल?

>> तुम्ही सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करावे लागेल.

>> आता गुगल डॉट कॉम वर जाऊन गुगल अकाऊंट सर्च करा.

>> लॉगइन करताना गुगल क्रिडेशियल्स टाइप करा.

>> उजव्या बाजूला तीन पॉइंट दिसतील. त्यावर क्लिक करा.

>> त्यानंतर डेटा आणि प्रायव्हेसी या पर्यायावर क्लिक करा. पुढे 'History Setting' वर क्लिक करा.

>> 'वेब आणि अॅप अॅक्टिव्हीटी' वर टॅप करा. 'मॅनेज ऑल वेब एन्ड अॅप अॅक्टिव्हिटीज'वर क्लिक करा.

>> सर्च बारवरील तीन पॉइंटवर क्लिक करा. त्यानंतर त्यावर टॅप करा.

>> 'Other Google activity' यावर सिलेक्ट करा. त्यानंतर गुगल एक्सपीरियन्स चेक करा.

>> गुगल पे एक्सपीरियन्सवर जाऊन 'मॅनेज अॅक्टिव्हीटी' पर्याय दिसेल.

>> मॅनेज अॅक्टिव्हीटीच्या ड्रॉप डाऊन ऐरोचा पर्याय दिसेल. यात तुम्ही ट्राजेंक्शन हिस्ट्री पाहू शकता,तसेच सिलेक्ट करु शकता.

>> पुढे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. तेव्हा तुम्ही शेवटचा एक तास, शेवटचा दिवस आणि पूर्ण वेळ असा पर्यायचा वापर करून ट्राजेंक्शन हिस्ट्री डिलीट करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत राणा दांपत्याच्या गणपती बाप्पाचा विसर्जन

Pav Bhaji Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल झणझणीत पाव भाजी; वाचा सोपी रेसिपी

Pear: बाजारातून गोड आणि रसाळ पेर निवडायचंय? खरेदी करताना हे ४ उपाय लक्षात ठेवा

PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT