Deepfake Yandex
लाईफस्टाईल

Deepfake: 'शक्ती'मुळे डीपफेकला बसणार आळा; गुगलचं नवीन टूल लॉन्च

Deepfake Content Fact Check Tool: गुगलने डीपफेक कंटेंटची सत्यता पडताळण्यासाठी एक नवीन टूल लॉन्च केलं आहे. याच्या मदतीने आताडीपफेक कंटेंटला आळा बसणार आहे.

Rohini Gudaghe

Fact Check Tool For Deepfake Content

भारतामध्ये लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये डीपफेक व्हिडिओ आणि फोटोंचा धोका सर्वांनाच सतावत (Google Lauch New Tool) आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी निवडणूक आयोग आणि सरकार प्रयत्न करत आहेत. सरकारने गुगलसह मेटाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून डीपफेक सामग्री काढून टाकण्याची सूचना केली आहे. सरकारच्या सूचनेनुसार गुगल आणि मेटाने त्यांचे डिपफेक चेकर टूल्स देखील लॉन्च केले आहेत. (Latest Marathi News)

मेटाने अलीकडेच व्हॉट्सॲपवर डीपफेक व्हिडिओ चेक करण्यासाठी एक चॅटबॉट सादर केला होता. याद्वारे सामान्य वापरकर्ता व्हॉट्सॲपच्या या चॅटबॉटचा वापर करून संशयित डीपफेक व्हिडिओ आणि फोटो तपासू (Fact Check For Deepfake Content) शकतात. आता गुगलनेआणखी एक टूल सादर केलं आहे. या टुलला गुगलने 'शक्ती' असं नाव दिलं आहे. या टूलच्या मदतीने डीपफेक व्हिडिओ आणि फोटो सहजपणे शोधता येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुगल इंडियाने एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या बनावट सामग्रीला आळा घालण्यासाठी शक्ती प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्याच्या मदतीने, आपण कोणतीही सामग्री तपासू शकता आणि त्याची सत्यता शोधू शकता. एवढेच नाही तर कंपनीची एक टीम बनावट आणि आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे काम करणार (Deepfake)आहे .

फॅक्ट चेकर्ससोबत मेटाचा करार

मेटाने 15 भारतीय भाषांमध्ये 11 स्वतंत्र तथ्य तपासणी भागीदारांशी करार केला आहे. मेटा कंपनी त्यांना मेटा कंटेंट लायब्ररीमध्ये प्रवेश देईल. जेणेकरुन एआयने तयार केलेली सामग्री हाताळता (Fact Check Tool) येईल. एआय ने तयार केलेले ऑडिओ, व्हिडिओ आणि डीपफेक व्हिडिओ आणि इतर सामग्री तपासतील. त्यांची सत्यता तपासली जाईल.त्यांना रेंटींग केले जाईल. मेटा AI ने बनवलेल्या फोटो आणि व्हिडीओवर एक विशेष प्रकारचे मार्कर लावणार आहे. त्यामुळे कंटेटची सत्यता लक्षात येईल.

व्हॉट्सॲपचॅटबॉट कसं कार्य करते?

व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने व्हॉट्सॲपवरील डीपफेक व्हिडिओ शोधण्यासाठी चॅटबॉट तयार केलाय. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही कोणत्याही डीपफेक व्हिडिओची सहज तपासणी करू (Google New Tool) शकता. व्हॉट्सॲपच्या डीपफेक चॅटबॉटद्वारे तुम्ही काही मिनिटांत डीपफेक व्हिडिओंची तपासणी होणार आहे. त्यामुळे डीपफेकला आळा बसणार आहे

लोकसभा निवडणुकीत डीपफेक चॅटबॉट

देशातील लोकसभा निवडणुकीत व्हॉट्सॲपचा डीपफेक चेकर चॅटबॉट अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या निवडणुकीत डीपफेक व्हिडिओ वापरले जाण्याची दाट शक्यता आहे.राजकीय पक्ष एकमेकांचा (AI) अपमान करण्यासाठी डीपफेक व्हिडिओ वापरू शकतात. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग आणि सर्वसामान्य जनता व्हॉट्सॲपच्या डीपफेक चॅटबॉटच्या मदतीने डीपफेक व्हिडिओंची सहज तपासणी करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT