Samsung Galaxy S24 Ultra वर मेगा डिस्काउंट, फ्लिपकार्टवर तब्बल हजारोंची मोठी सूट

Flipkart Deals: Samsung Galaxy S24 Ultra वर पुन्हा मोठी किंमत कपात झाली आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा प्रीमियम फोन तब्बल ₹50,000 पर्यंत कमी किमतीत आकर्षक ऑफरसह खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
Samsung Galaxy S24 Ultra वर मेगा डिस्काउंट, फ्लिपकार्टवर तब्बल हजारोंची मोठी सूट
Published On

Samsung Galaxy S24 Ultra

जर तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी मानली जाईल. 200MP कॅमेरासह येणारा Samsung Galaxy S24 Ultra सध्या मोठ्या सवलतीत उपलब्ध झाला आहे. हा फ्लॅगशिप खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ ठरू शकतो.

फ्लिपकार्टवर बिग बचत डेज सेल

फ्लिपकार्टवर बिग बचत डेज सेल सुरू आहे. या सेलमध्ये Samsung Galaxy S24 Ultra वर मोठी ऑफर उपलब्ध झाली आहे. 200MP कॅमेरासह येणाऱ्या या प्रीमियम फोनची किंमत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांना जबरदस्त फायदा मिळणार आहे.

Samsung Galaxy S24 Ultra ची मूळ किंमत

Samsung Galaxy S24 Ultra ची मूळ किंमत जरी ₹१,३४,००० पेक्षा जास्त असली, तरी सध्या हा प्रीमियम स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या ऑफर्समुळे तुम्ही तो कमी दरात खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता.

Samsung Galaxy S24 Ultra 5G चा 256GB

फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S24 Ultra 5G चा 256GB व्हेरिएंट ₹१,३४,९९९ मध्ये यादीत आहे. किंमत जास्त वाटत असल्यास काळजी करू नका, कारण सध्या कंपनी या फ्लॅगशिप मॉडेलवर तब्बल ३४% आकर्षक सवलत देत आहे.

बिग बचत डेज सेलमध्ये फोनची किंमत

बिग बचत डेज सेलमध्ये हा फोन आता फक्त ₹८७,९९९ मध्ये उपलब्ध असून, यावर तब्बल ₹४७,००० ची मोठी सवलत मिळते. फक्त फ्लॅट डिस्काउंटच नाही, तर अतिरिक्त बचतीचीही संधी ग्राहकांना मिळणार आहे, त्यामुळे डील अधिक फायदेशीर ठरते.

ग्राहकांना आकर्षक बँक ऑफर्स

फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S24 Ultra 5G खरेदी करताना ग्राहकांना आकर्षक बँक ऑफर्स मिळणार आहेत. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५% कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे ४००० रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत होऊ शकते. तसेच BHIM अॅप आणि Bajaj Finserv द्वारेही फायदे मिळतील.

मोठी एक्सचेंज ऑफर

फ्लिपकार्ट Samsung Galaxy S24 Ultra 5G साठी मोठी एक्सचेंज ऑफर देत आहे. तुमचा जुना फोन बदलून तुम्ही ₹४७,३०० पर्यंत बचत करू शकता. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या डिव्हाइसच्या स्थिती आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असेल.

Samsung Galaxy S24 Ultra फिचर्स

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये मागे टायटॅनियम फ्रेम आहे. हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह धूळ आणि पाणी या धोक्यांपासून वाचवतो. 6.8-इंच LTPO AMOLED डिस्प्ले असलेले हे डिव्हाइस Android 14 वर चालते आणि अपग्रेड सपोर्टसह येते.

बॅटरी आणि कॅमेरा सेटअप

या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला असून, 12GB RAM आणि 1TB स्टोरेजपर्यंत सपोर्ट मिळतो. याच्या मागील बाजूस 200MPसह क्वाड-कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला 12MP कॅमेरा आहे. 5000mAh बॅटरीसह दीर्घकालीन वापराची सुविधा मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com