कोणतीही माहिती सर्च करण्यासाठी आपण गुगलची मदत घेतो. यामध्ये जगभरातील माहिती सहज मिळवू शकतो. गुगलच्या माध्यामातून आपली अनेक कामे सहज आणि सूलभ होतात.
अशातच कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत गुगलवर कोणतीही गोष्ट सर्च करताना आपल्याला फ्रीमध्ये सेवा मिळत होती. परंतु, यापुढे कंपनी आपल्या धोरणात बदल करण्याची शक्यता आहे. कंपनी प्रिमियम वैशिष्ट्यांसाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. ही प्रिमियम वैशिष्ट्ये जनरेटिव्ह एआय मधून येणार आहे.
काही काळापूर्वी कंपनीने Google Search सह Generative AI चे स्नॅपशॉट फीचर लॉन्च केले होते. याच्या मदतीने AI वापरकर्त्यांना सर्च केलेल्या विषयाबद्दल माहिती पुरवते.
AI वापरकर्त्यांना सर्च केलेल्या विषयाचा सारांश दाखवते. मात्र कंपनी यात आता बदल करणार आहे. याबाबतीची माहिती दिली आहे फायनान्शिअल टाईम्सने त्यांनी म्हटले की, गुगलने नवीन बदल केले तर कंपनी (Company) त्याच्या सर्च इंजिनवर शुल्क आकारेल.
1. कंपनीने चार्जेस आकारण्याचा निर्णय का घेतला?
गुगल सर्चमधून कंपनी भरपूर कमाई करते, पण ChatGPT आल्यानंतर कंपनीच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला. ChatGPT सुरु होऊन जवळपास दीड वर्ष झाले असून कंपनी आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये मोठा बदल करण्याच्या विचारात आहे. गुगलने असा पर्याय शोधला आहे की ज्याद्वारे AI वैशिष्ट्ये प्रीमियम सबस्क्रिप्शनसह एकत्र केले जाऊ शकतात. जीमेल आणि डॉक्ससह जीमिनी एआय असिस्टंटची सुविधा कंपनी देत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.