Good Friday 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Good Friday 2023 : गुड फ्रायडेला मिळतेय लाँग विकेंडची सुट्टी, फिरण्यासाठी 'ही' ठिकाणे ठरतील बेस्ट !

कोमल दामुद्रे

Long Weekend Trip : नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे. या महिन्यात मुलांच्या शाळेला देखील सुट्टी मिळते. येणाऱ्या आठवड्यात अनेक सुट्टया आहेत. गुड फ्रायडे, ख्रिश्चन धर्माचा मुख्य सण, यावर्षी 7 एप्रिल 2023 रोजी साजरा केला जाईल. हा सण होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखला जातो.

या दिवशी ख्रिश्चन समुदायाचे लोक चर्चमध्ये प्रार्थना करतात आणि बायबलचे प्रवचन वाचतात. अशा स्थितीत गुड फ्रायडेनिमित्त शाळा (School), कॉलेज आणि ऑफिसला (Office) सुट्टी आहे. यावेळी गुड फ्रायडेला ३ दिवस सुट्टी आहे. गुड फ्रायडे ७ एप्रिल रोजी आहे. त्यालाच जोडून शनिवार आणि रविवार देखील सुट्टी असेल.

अशा वेळी तुम्ही वीकेंड ट्रिपची योजना आखू शकता आणि हा आठवडा तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी खास होऊ शकतो. गुड फ्रायडेची सुट्टी साजरी करण्यासाठी या भारतातील काही प्रसिद्ध ठिकाण सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये या सहलीचा आनंद घेऊ शकता.

1. उत्तराखंड

गुड फ्रायडेच्या तीन दिवसांच्या सुट्टीसाठी तुम्ही उत्तराखंडलाही भेट देऊ शकता. येथील हिरवीगार (Forest) जंगलं, बर्फाच्छादित पर्वत तुमच्या मनाला शांती देईल. येथे हिमालयाचे सौंदर्य पाहण्यासोबतच अनेक सांस्कृतिक संस्कृतीही पाहायला मिळतात. भव्य मंदिरांमुळेही ते जगभर प्रसिद्ध आहे.

2. वर्कला बीच, केरळ

ही वीकेंड ट्रिप अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही केरळला सहलीला जाऊ शकता. वर्कला बीचवर फिरता येते. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर दृश्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. येथे येण्यासाठी केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील वर्कला येथे रेल्वे मार्गाने प्रवास करता येतो. वर्कला बीच वर्कला रेल्वे स्टेशनपासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.

3. भेडाघाट, जबलपूर

गुड फ्रायडेच्या सुट्टीत तुम्ही जबलपूरलाही भेट देऊ शकता. भेडाघाट हे येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्याचे सौंदर्य तुम्हाला मोहित करेल. हे पर्यटन स्थळ जबलपूरपासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर आहे. येथे संगमरवरी खडकांमधून बाहेर पडणारी नर्मदा नदी पर्यटकांना आकर्षित करते.

4. कुल्लू, हिमाचल प्रदेश

कुल्लूला भेट देण्यासाठी तीन दिवस पुरेसा आहे. हे देशातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील पाइन जंगले, नद्या, साहसे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. येथे तुम्ही पॅराग्लायडिंग, राफ्टिंग, हायकिंग सारखे साहसी खेळ करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT