Gold Silver Price saam tv
लाईफस्टाईल

Gold Silver Price Today : सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीचा दरही वाढला; पाहा आजचा भाव

मंगळवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.

Satish Daud

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या (Silver Price) दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे. भारतीय सराफा बाजारात सोने (Gold Price) कधी महाग तर कधी स्वस्त होत आहे. आज म्हणजेच मंगळवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 52 हजार 470 रुपयांवर पोहचला. (Gold Silver Latest Price Today)

MCX वर सोन्याचा वायदे भाव 248 रुपयांनी वाढून 52,470 वर पोहचला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आज चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. चांदीचे दर 373 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 58,861 रुपये झाले आहेत. येत्या काही दिवसांत सोने-चांदी आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 3,789 रुपये प्रतितोळा स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव प्रतितोळा 56,200 रुपये इतका झाला होता. (Gold-Silver Price Hike Today)

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT