Laxmi Mata google
लाईफस्टाईल

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी 'ही' 5 कामं नक्की करा; घरात लक्ष्मीचं होईल आगमन

Diwali rituals for wealth: दिवाळी (Diwali) हा केवळ दिव्यांचा सण नाही, तर तो धन, धान्य आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी हिच्या आगमनाचा उत्सव आहे. कार्तिक अमावस्येच्या रात्री लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी वास करण्यासाठी येते, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा दिवस फक्त प्रकाश आणि आनंदाचा उत्सव नसून अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा संदेश या सणाच्या दिवशी दिला जातो. दिवाळीच्या रात्रीला ‘महानिशा’ असंही म्हटलं जातं. ‘महानिशा’ म्हणजे विशेष किंवा अत्यंत शुभ रात्र.

दिवाळीच्या या रात्री घर आणि अंगण सुंदर दिव्यांनी सजवण्यात येतं. अशी धारणा आहे की, दिवाळीच्या सकाळी योग्य कृती केल्यास माता लक्ष्मीचं आगमन निश्चित होतं. चला तर जाणून घेऊ या, दिवाळीच्या सकाळी कोणती 5 सोपी पण अतिशय महत्त्वाची कामं जरूर केली पाहिजेत.

घराचा मुख्य दरवाजा सजवा

घराचा मुख्य दरवाजा हा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे दिवाळीपूर्वी मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवून सुंदर रंगांनी सजवणं शुभ मानण्यात येतं. रंगीबेरंगी आणि आकर्षक दरवाजा केवळ पाहणाऱ्यांचं लक्ष वेधत नाही, तर तो सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीला आमंत्रण देतो.

दरवाजावर वंदनवार

मुख्य दरवाजावर वंदनवार किंवा फुलांची माळ लावणं हे सौभाग्य आणि मंगलाचं प्रतीक मानण्यात येतं. असं म्हटलं जातं की, दरवाजावर वंदनवार लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. दिवाळीच्या दिवशी विशेषतः अशोकाच्या पानांची वंदनवार लावणं अत्यंत शुभ मानण्यात येतं.

गंगाजल शिंपडा

प्राचीन काळापासून आपल्याकडे घरात शुद्धता आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी गंगाजल शिंपडण्याची परंपरा आहे. अशी मान्यता आहे की, गंगाजलाच्या स्पर्शानेच राजा भगीरथांच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त झाला. गंगाजल घरात शिंपडल्याने देवदेवतांची कृपा मिळते आणि वातावरण पवित्र राहण्यास मदत होते.

स्वस्तिक चिन्ह

मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढणं हे शांती, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा थांबवतं आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी दरवाजावर स्वस्तिक काढणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. हे चिन्ह घराला आध्यात्मिक संरक्षण देतं असंही मानलं जातं.

देवाची पुजा करा

दिवाळीच्या सकाळी घरातील मंदिरात पूजा करून दीप लावावा आणि आपल्या इष्टदेवाचे मंत्र जपावेत. मंत्रजपाने मन शांत होते आणि मंत्रांच्या ध्वनीमुळे घरात पवित्र वातावरण निर्माण होते. प्रत्येक देवतेचे विशिष्ट मंत्र दिव्य शक्ती देतात आणि घरात सुख-समाधान राखतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT