Jasmin Face Pack Saam Tv
लाईफस्टाईल

Jasmin Face Pack : चेहऱ्यावरील निस्तेजपणा घालवण्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंधी फेसपॅक बनवा

Skin Glowing Face Pack : मोगऱ्याची फुले उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत भरपूर फुलतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jasmin Face Pack For Glowing Skin : मोगऱ्याची फुले उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत भरपूर फुलतात. मोगर्‍याच्या फुलांचा वापर पूजेपासून घराच्या सजावटीपर्यंत केला जातो.

या फुलांचा मधुर सुगंध घराला सुगंधित करतो. यावेळी जर तुमच्याकडे मोगऱ्याची भरपूर फुले आणत असाल तर त्या फुलांचा वापर तुम्ही चेहऱ्याची (Face) चमक आणि तेज आणण्याची पद्धत सांगणार आहोत.

मोगराच्या फुलांचा फेस पॅक

मोगराच्या फुलांचा फेस पॅक (Face Pack) बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचा मोगरा फ्लॉवर पावडर लागेल. या पावडरमध्ये गुलाबजलाचे काही थेंब, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा दही घाला. सर्व घटक चांगले मिसळून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे तशीच राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. तुम्हाला पहिल्यांदाच ताजेपणा जाणवेल.

मोगराच्या फुलाची पावडर

मोगराच्या फुलाची पावडर घरी बनवता येते. यासाठी मोगऱ्याची फुले 2 ते 3 दिवस कापडावर ठेवून सुकवून घ्या आणि नंतर वाळलेल्या फुलांची पावडर बनवा.

मोगरा पासून टोनर बनवा

  • यासाठी एका पातेल्यात साधारण 1 ग्लास पाणी (Water) टाकून गॅसवर ठेवावे लागेल.

  • पाणी गरम झाल्यावर त्यात 8 ते 10 मोगऱ्याची फुले टाका आणि उकळायला लागल्यावर गॅस बंद करा.

  • पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर फुले गाळून फवारणीच्या बाटलीत भरून ठेवा.

  • तुमचा मोगरा फुलांचा टोनर तयार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

Local Body Election: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार, किती टप्प्यात होणार निवडणूक?

Diabetes Paitent: मधुमेह रूग्णांनी हे ५ पदार्थ कधीही खाऊ नयेत, रक्तातील साखर वाढते

SCROLL FOR NEXT