ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

गंजलेल्या वॉशिंग मशिनला पुन्हा द्या नवा लूक !

आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात वॉशिंग मशीन वापरली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हल्ली वॉशिंग मशिन काळाची गरज झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात वॉशिंग मशीन वापरली जाते. अनेक महिला कपडे धुण्यासाठी दररोज मशीन वापरतात आणि त्यामुळे मशीन अधिक घाण होते.

हे देखील पहा-

अनेक वेळा पावसामुळे (Monsoon) मशिन गंजण्याची किंवा खराब होण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे आपण मशीन बदलण्याचा विचार करतो परंतु, मशीनीच्या आतील आवरण चांगले असेल तर आपण त्याचा बाहेरील लूक बदलू शकतो. लूक कसा बदलायचा हे पाहूया.

१. आपल्या वॉशिंग मशिनला नवीन लूक द्यायचा असेल तर आपण त्याला वॉल पेपरने सजवू शकतो. बाजारात हल्ली प्रिंटेड किंवा डिझायनर वॉलपेपर मिळतात त्याचा वापर आपण करु शकतो.

२. बाजारात आजकाल अनेक प्रकारचे मशीन कव्हर मिळतात. फॅब्रिक मशीन कव्हर, प्रिंटेड मशीन कव्हर, वॉलपेपरचे मशीन कव्हर इत्यादी. कव्हरच्या डिझाईन व्यतिरिक्त, आपण त्याच्या बॉडीनुसार कव्हर, हाफ बॉडी कव्हर देखील वापरू शकतो.

३. आपल्या मशीनला नवीन लुक देण्यासाठी आपण डिझायनर स्टिकर्स देखील वापरू शकतो. आपण आपल्या मशीनवर डिझायनर स्टिकर वापरून आपण ते सजवू शकतो. आपल्याला बाजारात अनेक प्रकारचे स्टिकर्स मिळतील छापील स्टिकर, साधे स्टिकर इ.

४. मशीनला स्टीकर्स लावल्याने आपल्या स्वयंपाकघराला लूक द्यायचा असेल, तर आपण प्रिंटेड किंवा कलरफुल प्रिंट्सही निवडू शकतो. यामुळे मशीन अधिक आकर्षक दिसेल आणि आपल्या घराचा लुक खराब होणार नाही.

५. बाजारात अनेक प्रकारचे स्प्रे पेंट्स मिळतात जे मशीनवर किंवा फ्रीजवर केले जातात. मशीनवर पेंट करण्यासाठी आपण बाजारातून (Market) स्प्रे पेंट किंवा ऑइल पेंट पॉलिश खरेदी करू शकतो. स्प्रे पेंटमुळे आपले मशिन नव्यासारखी दिसेल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhaji Bhide Video : संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान, १५ ऑगस्ट अन् भगवा झेंड्यावर केले वक्तव्य

Budget Smartphone: कमीत कमी बजेटमध्ये स्मार्ट फीचर्स! १ हजार रुपयांपेक्षा स्वस्त फोनमध्ये 4G, UPI आणि कॅमेरा

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेटसाठी शेवटचे ८ दिवस, डेडलाइननंतर लागणार ₹१०,००० चा दंड

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी, औषधांवर २५० टक्के टॅरिफ, फार्मा क्षेत्राला धक्का

SCROLL FOR NEXT